विष्णुपुरी प्रकल्प भरला, कोणत्याही क्षणी दरवाजे उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 11:48 AM2020-07-10T11:48:20+5:302020-07-10T11:50:09+5:30
विष्णुपुरी प्रकल्प शुक्रवारी सकाळी 10 वाजता 90 टक्के भरला.
Next
नांदेड : नांदेड शहराची तहान भागवणाऱ्या विष्णुपुरी प्रकल्प शुक्रवारी सकाळी 10 वाजता 90 टक्के भरला. प्रकल्पात येवा सुरु असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे.
विष्णुपुरी प्रकल्प क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने गुरुवारपर्यंत 72 टक्के जलसाठा झाला होता. प्रकल्प क्षेत्रातील परभणी, पूर्णा भागात जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 11 वाजता विष्णुपुरी 92 टक्के भरले होते. प्रकल्पात पाण्याचा येवा सुरुच असल्याने प्रकल्पाचे दरवाजे उघडण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे. जुलेमध्येच प्रकल्पाचे दरवाजे उघडावे लागत आहेत