विष्णुपुरी प्रकल्प तुडुंब भरला, तरीही नांदेडकरांना तीन दिवसाआड पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:25 AM2021-06-16T04:25:35+5:302021-06-16T04:25:35+5:30
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वच भागात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात ...
गेल्या २४ तासात जिल्ह्यात सर्वच भागात कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. त्यात हदगाव मंडळात ६२ मिमी किनवट तालुक्यातील जलधारा ६१.५ मिमी, मांडवी ७८.८ मिमी, दहेली ७३.८ मिमी, माहूर तालुक्यातील वाई-७१.५ मिमी, सिंदखेड ७६.३ मिमी, धर्माबाद मंडळात ८२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात १६ तालुक्यात सरासरी ३३.६ मिमी पावसाची नोंद झाली असून, आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १८२.१ मिमी पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या १६.२ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप पिकांबाबत आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यातील १६ तालुक्यात गेल्या २४ तासात झालेला पाऊस कंसात दिला आहे व त्यापुढे आतापर्यंत झालेल्या पावसाची आकडेवारी दिली आहे. नांदेड (१६.३ मिमी) ८०.१ मिमी, बिलोली (३६.५ मिमी) १४४.६ मिमी, मुखेड (२६.४ मिमी) १५० मिमी, कंधार (२३.४ मिमी) १५५.६ मिमी, लोहा (२४.२ मिमी) १२३ मिमी, हदगाव (४२.४ मिमी) ११९.६ मिमी, भोकर (२० मिमी) १०१.७ मिमी, देगलूर (२१.६ मिमी) १७६.७ मिमी, किनवट (६०.५ मिमी) १६२.९ मिमी, मुदखेड (२४.४ मिमी) ८९.९ मिमी, हिमायतनगर (३९.८ मिमी) १२८.८ मिमी, माहूर (६१.६ मिमी) १६३.६ मिमी, धर्माबाद (६३.९ मिमी) १६३.८ मिमी, उमरी (४३.९ मिमी) ११०.७ मिमी, अर्धापूर (८.१ मिमी) ९०.८ मिमी, नायगाव (३७.८ मिमी) १२०.८ मिमी.