विश्वजीतचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:18 AM2021-01-03T04:18:59+5:302021-01-03T04:18:59+5:30

शिवरस्त्यावर अतिक्रमण नांदेड : धनेगाव येथील शिवरस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटवून शिवरस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात ...

Viswajit's felicitation | विश्वजीतचा सत्कार

विश्वजीतचा सत्कार

Next

शिवरस्त्यावर अतिक्रमण

नांदेड : धनेगाव येथील शिवरस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केले असून अतिक्रमण हटवून शिवरस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. असे धनेगाव येथील प्रभाकर पवळे यांनी नमूद केले.

ओबीसी जनगणना संदर्भात बैठक

नांदेड : मराठवाडा व नांदेड जिल्हा पद्मशाली कर्मचारी संघटनेची ओबीसी जनगणना संदर्भात बैठक २७ डिसेंबर रोजी कलामंदिर येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर सुंकरवार होते. यावेळी उपाध्यक्ष प्रल्हाद सुरकुटवार, चंद्रकांत अलसेटवार, बालाजी कोंपलवार, लक्ष्मीकांत गोणे, डॉ. मारोतीराव कॅतमवार, कविता गड्डम, प्रकाश मारावार, माधव साठे, संग्राम निलपत्रेवार, प्रा. गोविंद रामदीनवार यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष व्यंकटराव चिलवरवार यांनी केले.

जिल्हाध्यक्षपदी शिंगे

नांदेड : रिपब्लिकन एम्प्लॉइज फेडरेशनच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी गणेश शिंगे यांची निवड झाली. याबद्दल रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सोनवणे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मराठवाडा उपाध्यक्ष बालाजी धनसरे, जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकर, महिला आघाडीच्या नीशा सोनवणे, प्रसन्नजीत अवताडे, शैलेश कांबळे, राजू माने, लखन पाईकवार आदी उपस्थित होते.

दुचाकी लंपास

नांदेड : राधिकानगर तरोडा नाका येथील राम शेळके यांची दुचाकी २७ डिसेंबर रोजी चोरीस गेली. एम.एच.२६-वाय. ७२६८ या क्रमांकाची दुचाकी ओम गार्डन येथून लंपास झाली. ग्रामीण पोलिसात याप्रकरणी तक्रार देण्यात आली.

अज्ञात इसमाचे प्रेत

नांदेड : इतवारा भागातील भाजी मार्केटजवळ ५० ते ६० वर्षीय इसमाचे प्रेत सापडले. मयताचे लिव्हर व फुप्फुस खराब झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोस्टमार्टममध्ये निष्पन्न झाले. इतवारा पोलीस इसमाच्या नातेवाइकांचा शोध घेत आहे. सदर इसमाचे प्रेत शवागृहात ठेवण्यात आले आहे.

जिल्हाध्यक्षपदी परमार

नांदेड : मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षपदी शक्तिसिंग परमार यांची निवड झाली आहे. परमार हे २००७ पासून उपाध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांना जिल्हाध्यक्ष माँटीसिंघ जहागीरदार, शहराध्यक्ष अब्दुल शफीक यांनी शुभेच्छा दिल्या.

महिला बचत गटांना कर्ज

नांदेड : जिल्हा स्वयंसाहाय्यता बचत गट पतसंस्थेच्या कार्यालयात महिला बचत गटातील महिलांना कर्ज वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ.पी.डी. जोशी होते. कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक एम.एम. सूर्यवंशी, अर्चना पारळकर, संगीता कांबळे, आशा सूर्यवंशी, आकाश मोरे, एकनाथ पाच्छे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Viswajit's felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.