नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 01:21 AM2018-07-13T01:21:20+5:302018-07-13T01:25:17+5:30

नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे.

Voters list announced for Nanded Gurudwara Board elections | नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

नांदेड गुरुद्वारा बोर्डाच्या निवडणुकीसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर

Next
ठळक मुद्देनाव नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाच्या तीन सदस्य निवडणुकीची मतदार यादी तयार करणे व प्रसिद्धीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला आहे. यासाठी मतदार नोंदणीचे अर्ज संबंधित तहसील कार्यालयात २० जुलै ते १८ आॅगस्ट या कालावधीत उपलब्ध राहणार असून १ जुलै २०१८ रोजी विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदार यादीत ज्यांची नावे आहेत व जे सामान्यत: जुन्या हैदराबाद संस्थांचा भाग महाराष्ट्र राज्यात समाविष्ट केलेल्या भागात राहतात अशा सर्व शिख मतदारांना या मतदार यादीत नाव नोंदविता येणार आहे.
नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब मंडळाची निवडणूक घेण्याचे शासनाने ठरविले असून अबचलनगर साहिब मंडळाच्या अधिनियम १९५६ च्या कलम ६ पोटकलम २ अन्वये बोर्डाची तीन सदस्य निवडणूक घेण्यासाठी ही मतदार यादी तयार करण्यात येणार आहे.
साधाणत: औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, बीड, लातूर हे जिल्हे व चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा, कोरपणा, जीवती तहसील या भागातील शिख मतदारांना या मतदार यादीत नाव नोंदविता येईल.
पात्र मतदारांनी २० जुलै २०१८ या तारखेपासून ३० दिवसात त्यांचे नाव मतदार यादीत नोंदवायचे आहे. प्रारूप मतदार यादी तयार झाल्यानंतर नांदेड जिल्हाधिकारी यांच्या संकेतस्थळावर व गुरुद्वारा बोर्डाच्या कार्यालयात ही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर नियम ९ व १० प्रमाणे कार्यवाही होऊन अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी सांगितले आहे.
---
असा आहे मतदारयादी नोंदणी कार्यक्रम
१ जुलै २०१८ रोजी महाराष्ट्र विधानसभा मतदार यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी २० जुलै ते १८ आॅगस्ट या ३० दिवसात संबंधित तहसील कार्यालयात फॉर्म १ भरुन द्यावा लागणार आहे. त्यानंतर १९ आॅगस्ट ते २५ आॅगस्ट या कालावधीत सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी प्रारुप मतदार यादी तयार करणार आहेत. ही यादी २७ आॅगस्ट २०१८ रोजी प्रसिद्ध होणार आहे. २८ आॅगस्ट ते २६ सप्टेंबर या कालावधीत सक्षम अधिकारी तहसीलदार फॉर्म २ नुसार दावे व हरकती स्वीकारतील. २७ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर सक्षम अधिकारी, जिल्हाधिकारी दावे व हरकती निकाली काढतील. ५ आॅस्टोबर ते १९ आॅक्टोबर या कालावधीत सक्षम अधिकारी विभागीय आयुक्त यांच्याकडे जिल्हाधिकारी नांदेड यांच्या निर्णयाविरुद्ध अपिल करता येईल. २० ते २६ आॅक्टोबर विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेली अपिल प्रकरणे निकाली काढण्यात येतील.३ नोव्हेंबर २०१८ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

Web Title: Voters list announced for Nanded Gurudwara Board elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.