वाहब सिद्दीकी सेवानिवृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:15 AM2021-01-04T04:15:41+5:302021-01-04T04:15:41+5:30

जिल्हाध्यक्षपदी सुभाष पवार बिलोली : भाजप प्रज्ञा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीचे ...

Wahab Siddiqui retired | वाहब सिद्दीकी सेवानिवृत्त

वाहब सिद्दीकी सेवानिवृत्त

Next

जिल्हाध्यक्षपदी सुभाष पवार

बिलोली : भाजप प्रज्ञा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पालिकेचे माजी नगराध्यक्ष सुभाष पवार यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीचे पत्र खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी पवार यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नरेंद्र पवार, बेंद्रेकर, आदित्य शिरफुले, अमोल ढगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

दोन ट्रॅक्टर पकडले

हदगाव : तालुक्यातील पिंपरखेड येथे महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अवैध वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले. नायब तहसीलदार स्नेहलता स्वामी यांनी ही कारवाई केली. दरम्यान, तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. कारवाई केल्यानंतर दोन दिवस उपसा थांबतो, त्यानंतर पुन्हा सुरू होतो, असा अनुभव गावकरी घेत आहेत.

मांडवी रस्त्याची पाहणी

मांडवी : किनवट तालुक्यातील लिंगीतांडामार्गे मांडवीकडे जाणाऱ्या रस्त्याची पाहणी डॉ. विपीन ईटणकर यांनी १ जानेवारी रोजी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी धनवे यांची उपस्थिती होती. यानंतर मांडवी पोलीस स्टेशनला भेट देऊन ईटणकर यांनी पाहणी केली. यावेळी सपोनि. संतोष केंद्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

अभिवादन कार्यक्रम

किनवट : येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्तमराव राठोड यांच्या अर्धकृती पुतळ्यास भाजपचे राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आ. भीमराव केराम, संध्या राठोड, जि.प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड, शिवराज राघू, प्रफुल्ल राठोड, शंकरराव चाडावार, जसवंतसिंघ सोखी, आनंद मच्छेवार, बाबूराव केंद्रे, संदीप केंद्रे, प्राचार्य डॉ. शिवराम बेंबरेकर आदी उपस्थित हाेते.

विजयस्तंभाला मानवंदना

बाऱ्हाळी : येथील विश्वशांती जयंती मंडळाच्या वतीने शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून शौर्य दिनानिमित्त मानवंदना देण्यात आली. यावेळी हणमंत वाडीकर, धोंडराम अस्वले, नामदेव गऊलवार, सुभाष कांबळे, विलास नेवळीकर, अशोक नेवळीकर, अमर सोनकांबळे, अमोल सोनकांबळे, जगदीश भालेराव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांची भेट

हिमायतनगर : विकेल ते पिकेल अभियानांतर्गत महात्मा जोतिबा फुले शेतकरी बचत गटाच्या चिकन सेंटरला जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटणकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी बचत गटाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, कृषी अधिकारी चलवदे, श्याम ढगे, श्यामसुंदर ढगे, सदानंद ढगे आदी उपस्थित होते.

प्रवाशांना मनस्ताप

देगलूर : देगलूर आगारातील अनेक बस नादुरुस्त असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शुक्रवारी देगलूर- औरंगाबादकडे जाणारी बस रस्त्यातच बंद पडली. मुळात ती नादुरुस्त होती. नादुरुस्त बसला सोडू नये असे संकेत असतानाही संबंधितांनी याकडे दुर्लक्ष करून ती सोडण्यात आल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: Wahab Siddiqui retired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.