नांदेड जिल्ह्यात ३१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 01:30 AM2019-01-16T01:30:59+5:302019-01-16T01:32:21+5:30
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या ...
नांदेड : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकºयांना कर्जमाफी जाहीर केली़ परंतु, तत्त्वत: अन् ओटीएसच्या कचाट्यात आजही लाखो शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही़ एकट्या नांदेड जिल्ह्यात ३१ हजार १०५ शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे़
उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर तेथील मुख्यमंत्री योगी यांनी शेतकºयांना कर्जमाफी दिली. उत्तर प्रदेशात कर्जमाफी करता येते; मग महाराष्ट्रात का नाही, या मुद्यावर विरोधकांसह विविध शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्याने शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला़ नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकºयांना सदर कर्जमाफीचा फायदा होईल, असे बोलले जात होते़ परंतु, १ लाख ७६ हजार ५० शेतकरीच कर्जमाफीस पात्र ठरले़ त्यातही आजपर्यंत प्रत्यक्ष १ लाख ४४ हजार ९४५ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे़ या सर्व शेतकºयांच्या बँक खात्यात ७८७ कोटी ९८ लाख रूपये जमा करण्यात आले आहेत़
नांदेड जिल्ह्यातील शेतकºयांवर खासगी आणि सरकारी बँकांचे मिळून एकूण १ हजार ५४१ कोटी ९१ लाख रुपयांचे कर्ज होते़ त्यापैकी ७८७ कोटी रूपये आजपर्यंत बँकांच्या खात्यात वर्ग झाले आहेत़ नांदेड जिल्ह्यासाठी १ हजार २३ कोटी ८९ लाख रूपये मिळाले होते़ त्यापैकी २३५ कोटी रूपये आजही बँकांच्या खात्यात पडून आहेत़
राज्य सरकारने शेतकºयांना दिलेल्या कर्जमाफीत दीड लाख रूपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ केले़ तर दीड लाखाहून अधिक कर्ज असणाºया शेतकºयांसाठी एकरकमी परतफेड योजना लागू केली होती़ परंतु, या योजनेकडे शेतकºयांनी पाठ फिरविली आहे़ त्यामुळेच ३१ हजार १०५ शेतकरी पात्र असूनही त्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जावू शकत नाही़ एकरकमी परतफेड योजनेचा लाभ घेऊन त्यांनी दीड लाखांवरील रक्कम भरल्यास २३५ कोटी ९६ लाख रूपयांचा लाभ मिळू शकेल़
- नांदेड जिल्ह्यात स्टेट बँक आॅफ इंडिया बँकेकडून सर्वाधिक ७६ हजार ८८० शेतक-यांना ५३० कोटी ७७ लाख रूपये कर्जमाफी देण्यात आली आहे़ तर बँक आॅफ महाराष्ट्रामधून ६ हजार ५१४ शेतक-यांना ३० कोटी ७६ लाख रूपये, डीसीसीबी बँकेतून ३९ हजार ४०७ शेतकºयांना ५३ कोटी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली़
खावटी कर्ज माफ करण्याचा सरकारचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत खावटी कर्ज माफ करण्याचा निर्णय मंगळवारी राज्य सरकारने घेतला आहे़ त्यानुसार जिल्ह्यातील हजारो शेतकºयांना लाभ मिळणार आहे़ सरकारकडून कर्जमाफी संदर्भात वारंवार वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत़ त्यामुळे येणाºया काळात सरसकट कर्जमाफी केली जाईल, या आशेने दीड लाखावरील कर्ज भरण्यास कोणीही शेतकरी धजावत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे़