नांदेडमध्ये शिवशाहीची प्रतीक्षा संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2017 01:08 AM2017-12-06T01:08:05+5:302017-12-06T01:08:13+5:30
नांदेड: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाच्या वतीने वातानुकूलीत शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नांदेड विभागाला ३० शिवशाही बसेस मंजूर होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला़ नजीकच्या लातूर विभागात शिवशाही बसेस पोहोचल्या आहेत. परंतु नांदेडची प्रतीक्षा संपलेली नाही़
श्रीनिवास भोसले।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाच्या वतीने वातानुकूलीत शिवशाही बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या आहेत. नांदेड विभागाला ३० शिवशाही बसेस मंजूर होवून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी लोटला़ नजीकच्या लातूर विभागात शिवशाही बसेस पोहोचल्या आहेत. परंतु नांदेडची प्रतीक्षा संपलेली नाही़
दिवसेंदिवस घटणारे उत्पन्न वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत. परंतु कोणतीही योजना दीर्घकाळ टिकत नसल्याने योजनांवर होणाºया खर्चाने एसटी पुन्हा तोट्यात धावत आहे़ प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामंडळाने सुरु केलेली ‘वायफाय’ सुविधादेखील अल्पावधीतच बंद पडली़ तसेच अनेक महिन्यांपासून नांदेड विभागाला शिवशाही बसेसची प्रतीक्षा करावी लागत आहे. नांदेडातून पुणे, नागपूर, कोल्हापूर, मुंबई आदी ठिकाणी विविध ट्रॅव्हल्स धावतात. रेल्वे आणि बस हा पर्याय उपलब्ध झाल्यास खासगी ट्रॅव्हल्सच्या उत्पन्नात घट होईल. त्यामुळे ट्रॅव्हल्सचालक अधिकाºयांशी साटेलोटे करुन पुण्यासाठी रेल्वे अथवा वातानुकूलीत बसेस सोडल्या जात नसल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत.
देखभाल : दुरूस्तीचा प्रश्न उद्भवू शकतो
४दरम्यान, यापूर्वी शहर बससेवेसाठी ‘जेएनएनयुआरएम’ अंतर्गत टाटा कंपनीच्या १५ बसेस मिळाल्या होत्या, परंतु नांदेड विभागात टाटा कंपनीच्या अत्याधुनिक बसेसच्या देखभालीची व्यवस्था नसल्याने सदर बसेस दुरुस्तीअभावी बंद आहेत. शिवशाही बसेसमध्ये देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. टाटा कंपनीच्या असलेल्या या बसेसची नांदेड विभागात नियमित देखभाल दुरुस्ती होऊ शकेल की नाही, यावरही यांत्रिक विभागाने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे़