‘त्या’ धैर्यामागे केवळ माणुसकी होती...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 12:05 AM2017-12-08T00:05:14+5:302017-12-08T00:07:06+5:30
विशाल सोनटक्के । लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : आपल्या हातून काही मोठे कार्य झाले याचा लवलेश ना त्याच्या चेहºयावर ...
विशाल सोनटक्के ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आपल्या हातून काही मोठे कार्य झाले याचा लवलेश ना त्याच्या चेहºयावर ना त्याच्या बोलण्यात़ आठ महिन्यांपूर्वीची ती घटना आठवल्यानंतर आजही मी अस्वस्थ होतो़ साहेब दोघींना वाचविल्याचे समाधान आहे. मात्र, काही मिनिटे अगोदर नदीवर पोहोचलो असतो तर आणखी दोघींनाही वाचविता आले असते़ काही मिळेल म्हणून मी पाण्यात उडी मारली नव्हती़, तर त्या धैर्यामागे केवळ माणुसकी होती़
अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील एजाज अ़रऊफ नदाफ ‘लोकमत’शी बोलत होता. जीवाची पर्वा न करता वाहुन जाणाºया दोन तरुणींना वाचविले़ या धैर्याबद्दल एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार २०१७ जाहीर झाला आहे़ यंदा हा पुरस्कार मिळविणारा एजाज हा महाराष्ट्रातील एकमेव असून २६ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एजाजचा गौरव होणार आहे़ गुरुवारी सकाळीच एजाजशी संवाद साधण्यासाठी थेट अर्धापूर तालुक्यातील पार्डी गाठले़ पार्डीत पोहोचल्यानंतर पानटपरीचालकाला एजाज बद्दल विचारले असता़ ‘एजाज अभीच घर गया, दो मिनीट रुको, उसे बुलाता हु़’ असे सांगत पानटपरी चालक तरुणाने उत्साहात एजाजला फोन करुन पानटपरीवर बोलविले़ पानटपरी चालक सोहेल शेख आणि त्याचा मित्र शेख समीरने सोहेलची कामगिरी सांगण्यास सुरुवात केली़ त्या दुर्घटनेत माझी आत्याची मुलगी सुमय्या (१६) हीचा बुडून मृत्यु झाला़ मात्र तिच्या सोबत असलेल्या दोघींना एजाजने मोठ्या धाडसाने वाचविले़ काही वेळातच एजाज पोहोचला़
एजाजच्या घरची परिस्थिती विलक्षण हलाकीची़ आईवडील बटईने घेतलेल्या शेतात दिवसरात्र राबतात़ त्यातुनही वेळ काढुन दोन पैशाच्या आशेने वडील होमगार्डची ड्युटी करतात़ गरीबीमुळेच मोठ्या भावाचे शिक्षण अर्धवट राहिलेले़ आता तोही शेतात आई, वडीलांसोबत राबत आहे़ घरी गेल्याबरोबर एजाज आईजवळ जाऊन बसला आणि ३० एप्रिल २०१७ रोजी घडलेली घटना डोळ्यासमोर उभी केली. दहावीत शिकणाºया एजाजला राष्ट्रीय शौर्य बालक पुरस्कार जाहीर झाल्याचे अप्रूप ग्रामस्थांनाही आहे़ कालच तहसीलदार अरविंद नर्सीकर यांनी पार्डी येथे जाऊन एजाजचा सत्कार केला़ गुरुवारी एजाज शिकत असलेल्या पार्डीतील राजाबाई हायस्कूलमध्येही शाळेच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला़
दोघींना वाचवू शकलो नसल्याची खंत...
त्या दिवशी नातेवाईकाचे लग्न होते़ दुपारच्या वेळी जेवण उरकून घराकडे निघालो असताना नदीकडून १०-१५ जण ओरडत येत असल्याचे पाहिले़ काय झाले म्हणून मी विचारत होतो़ मात्र काहीही समजले नाही़ नदीकडे काहीतरी झाले एवढेच लक्षात आले़ नदीच्या काठी बंधाºयासाठी मोठे खड्डे खोदले होते़ दुपारच्या वेळी तेथे गावातील बायका धुणी धुण्यासाठी जायच्या. त्यातल्याच काहीजणी नदी नजीकच्या त्या खड्ड्यात पडल्याचे कळले़ कसलाही विचार न करता पळत जाऊन मी पाण्यात उडी मारली़ सुरुवातीला आफरीन शेख (३२) यांना पाण्यातून बाहेर काढले़ त्यानंतर पुन्हा त्या पाण्यात उडी मारुन तबस्सूम शेख (१८) यांनाही वाचविण्यात मला यश आले़ मात्र त्याचवेळी आणखी दोघी पाण्यात बुडाल्या होत्या़ मी पाण्यात उडी मारुन त्यांचा शोध घेत असताना़ गावातील काही जण मदतीसाठी पुढे आले़ त्यांनीही पाण्यात उड्या मारल्या़ मात्र अफसर आणि शेख सुमय्या यांचा शोध लागला नाही़ साधारण अर्ध्या तासानी सुमय्याला बाहेर काढण्यात मला यश आले़ मात्र तिचा मृत्यू झाला होता़ या घटनेत अफसर शेख (३०) या महिलेचाही मृत्यू झाला़ दोघींना वाचविण्यात यश आले़ मात्र दोघींचा मृत्यू झाला़ त्याची खंत आजही वाटते़
- एजाज अ़रऊफ नदाफ
एजाजला शिकवून मोठे करणार...
आजच एका शिक्षकाने एजाजला डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक भेट दिले. मोठ्या मुलाला शिक्षण देता आले नाही़ ती कमी मी एजाजला शिकवून पूर्ण करणार आहे. त्याला शिकवून मोठे करणार आहे. - शमिम बेगम, एजाजची आई