खत प्रकल्पाची वाट बिकट

By Admin | Published: September 2, 2014 01:01 AM2014-09-02T01:01:27+5:302014-09-02T01:49:31+5:30

नांदेड : शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प बंद झाल्याने हा प्रकल्प उभारणीची वाट आता बिकट झाली आहे़

Wasting of fertilizer project | खत प्रकल्पाची वाट बिकट

खत प्रकल्पाची वाट बिकट

googlenewsNext


नांदेड : शहरातील घनकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तुप्पा येथे उभारण्यात आलेला महत्वाकांक्षी खत प्रकल्प बंद झाल्याने हा प्रकल्प उभारणीची वाट आता बिकट झाली आहे़
मागील दोन वर्षांपासून तुप्पा खत प्रकल्पाचे काम विविध कारणामुळे रखडले़ यासाठी एटूझेड कंपनीला अनेकवेळा मुदतवाढ दिली होती़ परंतु एटूझेड कंपनीने मुदतवाढीला केराची टोपली दाखवित हे काम औरंगाबाद येथील उपकंत्राटदाराकडे सपूर्द केले़ मे २०१३ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्यासाठी मनपा प्रशासनाने प्रयत्न केले़ शहरातील संकलित केलेला घनकचरा तुप्पा येथील प्रकल्पाच्या ठिकाणी टाकण्यातही आला़ मात्र प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेले नाही़ तुप्पा येथील खत प्रकल्पाचे काम करणाऱ्या एटूझेड कंपनीचे काम रद्द केले आहे़ त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे़ या प्रकियेनंतर खत प्रकल्पाच्या उर्वरित कामासाठी नव्याने निविदा मागविण्यात येतील़
मराठवाड्यातील पहिलाच खत प्रकल्प नांदेड येथे उभारण्यात येत असला तरी या प्रकल्पाच्या कामाला सुरूवातीपासून अनेक अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागली़ २० कोटी रूपयांचा हा प्रकल्प हरियाणा राज्यातील एटूझेड कंपनीकडून चालविण्यास दिला़ त्यानंतर काही दिवसांतच या प्रकल्पाचे काम रखडले़ मार्च २०१२ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती़ त्यानंतर मार्च २०१३ पर्यंत हा प्रकल्प सुरू करण्यास पाचव्यांदा मुदतवाढ देण्यात आली होती़
एटूझेड कंपनीने औरंगाबाद येथील मायोव या सहयोगी कंपनीसोबत करार करून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा प्रयत्न चालविला होता़ परंतु त्यांचा हा प्रयत्न अर्ध्यावरच थांबला़ त्यामुळे प्रशासनाने या प्रकल्पाचे काम बंद झाल्याचे स्पष्ट करीत संबंधित कंत्राटदाराकडून हे काम काढण्यात आले़ (प्रतिनिधी)
शहरातील घनकचऱ्यावर प्रक्रिया करून विल्हेवाट लावण्यासाठी अत्याधुनिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीने खतनिर्मितीचा प्रकल्प २०११ मध्ये हाती घेण्यात आला होता़ प्रकल्पाची जागा २४ एप्रिल २०१२ मध्ये कंत्राटदारास दिल्यानंतर १२ महिन्यांच्या आत प्रकल्प पूर्ण करणे बंधनकारक होते़ परंतु सदर प्रकल्प पूर्ण होवू शकला नाही़

Web Title: Wasting of fertilizer project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.