वाळूघाटांवर धाडी टाकल्या जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:04 AM2019-04-26T01:04:29+5:302019-04-26T01:07:38+5:30

जिल्ह्यातील वाळू घाटावरील अवैध प्रकार रोखण्यासाठी आता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कार्यरत तालुका सोडून अधिकारी आता दुसºया तालुक्यातील घाटांना दरमहा भेटी देणार आहेत.

Wataghat to be dumped | वाळूघाटांवर धाडी टाकल्या जाणार

वाळूघाटांवर धाडी टाकल्या जाणार

Next
ठळक मुद्देगौण खनिज दुसऱ्या तालुक्यातील अधिकारी करणार घाटांची तपासणी

नांदेड : जिल्ह्यातील वाळू घाटावरील अवैध प्रकार रोखण्यासाठी आता विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कार्यरत तालुका सोडून अधिकारी आता दुस-या तालुक्यातील घाटांना दरमहा भेटी देणार आहेत. त्याचवेळी तालुकास्तरावर नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली एक कायमस्वरुपी पथक नियुक्त करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वाळू माफीयाविरुद्ध रविवारपासून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. नांदेडसह मुदखेड तालुक्यात अवैधरित्या वाळू उपसा करणारे सक्शन पंप चक्क जिलेटीन कांड्याच्या स्फोटाने उडवून देण्यात आले.या धडक कारवाईने वाळू माफीयांना धडकी बसली.
वाळू उपशातील अनियमितता रोखण्यासाठी आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी चार पथके स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्हास्तरावरील एक विशेष पथक कायम आहे. त्याचवेळी दरमहा दुस-या तालुक्यातील नायब तहसीलदार हे कार्यरत तालुका सोडून अन्य तालुक्यांतील घाटांची पाहणी करणार आहेत.

  • दरमहा ही पाहणी होणार आहे. या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावयाचा आहे.
  • उपविभागीय अधिका-यांच्या नेतृत्वाखालीही पथकाची स्थापना करण्यात आली आहे. हे पथकही दुस-या तालुक्यातील वाळूघाटांची अचानक पाहणी करणार आहेत. या पथकात तहसीलदार, नायब तहसीलदार यांचा समावेश राहणार आहे.
  • तालुकास्तरावर आता नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली एक कायमस्वरुपी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन विभागाच्या एका कर्मचा-याचा समावेश आहे. जिल्ह्यात असलेल्या वाळूघाटावरील उपसा हा नियमानुसारच होईल, याची खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचवेळी अवैध उपसा करणा-यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असेही निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी सांगितले.

वर्षभरात ५ कोटी ७७ लाखांचा दंड वसूल
जिल्ह्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत महसूल विभागाने ४८० वाहनाविरुद्ध अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यातील ५६ वाहने जप्तही करण्यात आली आहेत. अवैध गौण खनिज उपसा प्रकरणात २३ गुन्हे जिल्ह्यात दाखल केले आहेत. या सर्व कारवाईत ५ कोटी ७७ लाख ८४ हजार रुपये दंड वसुली करण्यात आली आहे. जिल्ह्यात ३१ वाळूघाटांना यावर्षी मंजुरी मिळाली आहे. त्यातील १४ घाट आतापर्यंत लिलाव प्रक्रियेत गेले आहेत. १५ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया चौथ्या टप्प्यात सध्या सुरु आहे.
 

वाळू उपशासाठी नवनवे यंत्र
नांदेड : अवैध वाळू उपसा करणाºयांनी आता नवनवीन यंत्रांचा शोध लावला असून असेच वाळ ूउपसा करणारे यंत्र नांदेड तहसीलने कौठा भागात जप्त केले आहे. या कारवाईत दोन वाहनेही जप्त करण्यात आली.
तहसीलदार किरण अंबेकर यांच्या पथकाने कौठा भागात तपासणी केली असता गोदावरी नदीतून वाळू काढण्यासाठी जनरेटरवर चालणारी एक मशीन जप्त केली. या कारवाईत तहसीलदार अंबेकर, नायब तहसीलदार मुगाजी काकडे, मंडळ अधिकारी चंद्रशेखर सहारे, कोंडिबा नागरवाड, दीपक देशमुख, अनिरुद्ध जोंधळे, तलाठी हयून पठाण, मनोज देवणे, सयद मोहसीन, राहुल चव्हाण, उमाकांत भांगे आदी सहभागी झाले.

Web Title: Wataghat to be dumped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.