जिल्ह्यातील ५० टक्के अंगणवाड्यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच जलसंकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:24 AM2021-02-27T04:24:00+5:302021-02-27T04:24:00+5:30
नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, ...
नांदेड जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. काही ग्रामपंचायती नळजोडणी करण्यास टाळाटाळ करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान, अंगणवाडीला नळाद्वारे पाणी उपलब्ध करण्यासाठी उपअभियंत्यांनी ५ दिवसांत तांत्रिक मान्यता द्यावी, तसेच २० हजार रुपयांपर्यंतच्या कामांना संबंधित ग्रामपंचायतींनी प्रशासकीय मान्यता द्यावी, त्यापुढील कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्याकडे ३ दिवसांत पाठवावे, ग्रामपंचायतींनी यासाठी लागणार निधी १५ वित्त आयोग जलजीवन मिशनच्या निधीमधून वापरण्याबाबत ७ दिवसांत निर्णय घ्यावा, उपअभियंता, समग्र शिक्षा यांनी संपूर्ण योजनेची अंमलबजावणी करून योजना कार्यान्वित करण्यासाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित यंत्रणा जलदगतीने काम करताना दिसत नाही. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वी ५० टक्के अंगणवाड्यांसमोर जलसंकट निर्माण झाले आहे.
चौकट-
अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. अंगणवाडी केंद्रांना वैयक्तिक नळजोडणीद्वारे शाश्वत शुद्ध पेयजल उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही. जिल्ह्यातील एकूण ३ हजार १० अंगणवाड्यांपैकी दीड हजार अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले आहे. मात्र, निम्या अंगणवाड्यांत अद्यापही नळ जोडणी झाली नाही.
- राजेंद्र शिंगणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड