नांदेड शहरात अनेक भागांत पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:12 AM2021-07-12T04:12:58+5:302021-07-12T04:12:58+5:30

नांदेड शहरासह परिसरात एका दिवशी जास्त पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत. महापालिकेने ...

Water infiltrated in many parts of Nanded city | नांदेड शहरात अनेक भागांत पाणी शिरले

नांदेड शहरात अनेक भागांत पाणी शिरले

googlenewsNext

नांदेड शहरासह परिसरात एका दिवशी जास्त पाऊस झाल्याने ही परिस्थिती उद्‌भवली आहे. शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले आहेत. महापालिकेने ही आपत्कालीन परिस्थिती पाहता तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टर आणि २० मजूर पाण्याचा निचरा करण्यासाठी सज्ज ठेवले आहेत. त्याचवेळी विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात येणार आहे. त्याचवेळी आमदुरा बंधाऱ्याचे दोन दरवाजे तसेच बळेगाव बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये पाण्याचा येवा सुरूच आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता.

दरम्यान, रविवारी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत १०.८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. नांदेड ग्रामीण भागात २५.८ मि.मी. पाऊस झाला. वजिराबाद मंडळात १०.९, तुप्पा ६.३, वसरणी ११.३, विष्णुपुरी १०.३, लिंबगाव ७.८ आणि तरोडा मंडळात ४.३ मि.मी. पाऊस नोंदविला आहे. बिलोली मंडळात १३.५, सगरोळी १६.३, कुंडलवाडी १४, आदमपूर २२.५, लोहगाव २२.३; तर एकूण बिलोली तालुक्यात १८.७ मि.मी. पाऊस झाला. मुखेड मंडळात ४.३, जांब ०.३, येवती १.५, जाहूर ६.५, चांडोळा ५.५, बाऱ्हाळी २.५, मुक्रमाबाद ३.५ आणि मुखेड तालुक्यात सरासरी ३.४ मि.मी. पाऊस झाला आहे.

कंधार तालुक्यात ९.४, लोहा तालुक्यात ११.५ मि.मी. पाऊस झाला. हदगाव १२.९, भोकर १८.९, देगलूर १.५, किनवट २५.७, मुदखेड ११.४, हिमायतनगर १३.७, माहूर ३८.६, धर्माबाद १४.८, उमरी ३३.१, अर्धापूर १०.६ आणि नायगाव तालुक्यात १९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

Web Title: Water infiltrated in many parts of Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.