किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:55 AM2018-04-23T00:55:45+5:302018-04-23T00:55:45+5:30

तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़

Water pressure to 50 villages in the Kinka taluka | किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

किनवट तालुक्यात ५० गावांना पाणीटंचाईच्या झळा

Next
ठळक मुद्देमांडवी, उमरी सर्कलला फटका : विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : तालुक्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. नदी, नाले कोरडे पडले असून प्रकल्पातील साठ्यात घट होत असल्याने तालुक्यातील ५० हून अधिक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे़ सर्वाधिक टंचाईची झळ मांडवी, उमरी (बा़) सर्कलमध्ये बसू लागल्याचे चित्र आहे़
किनवट या डोंगराळ तालुक्यात १९१ महसुली गावे, १०५ वाडी-तांडे असून १३४ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्याची वार्षिक पर्जन्यमानाची सरासरी १ हजार २४० मि़मी़ इतकी असताना २०१७ च्या पावसाळ्यात ५६० मि़मी़ म्हणजे ४५ टक्के इतकाच पाऊस झाल्याने तालुक्यातील बहुतांश नाले पावसाळ्यातच कोरडे पडले़ प्रकल्पातही पाणीसाठा झालाच नाही़ पावसाळ्यात भूगर्भाची पातळी वर आलीच नाही़ त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपासूनच काही गावांना टंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली़ संभाव्य पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये व त्यावर उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पंचायत समितीने तात्काळ टंचाई आराखडा तयार करून जिल्हा प्रशासनाकडे पाठवून मंजुरी मिळवून घेतली़
विहीर, बोअर अधिग्रहणाचे ७० प्रस्ताव पं़ स़ च्या पाणीपुरवठा विभागाकडे प्राप्त झाले़ त्यापैकी ४३ प्रस्ताव तहसीलला पाठविले़ त्यातील चार प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे़ पाथरी, उमरी बा़, वडोली, निराळा तांडा, पळशी, अंबाडी, टेंभी, निराळा, सारखणी, मानातांडा, गोंडे महागाव, निचपूर, मार्लागुंडा, दरसांगवी (चि़), मोहाडा, लिंगी, नागझरी, रोडानातांडा, अंबाडी तांडा, सिरपूर, दुंड्रा, दीपलाना तांडा, चिंचखेड, रामपूर, नंदगाव, भिसी, तोटंबा, दिग्रस, मलकजांबतांडा, वाळकी बु़, सालाईगुडा, दयालधानोरा, कनकवाडी, नागापूर, कोपरा, सावरगाव, इरेगाव, बोधडी खु़, तल्हारी, कमठाला, मारेगाव खा़सह त्या-त्या ग्रा.प.अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांचे विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव आल्याने तालुक्यात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे़

६४७ पैकी ६३० हातपंप सुरू
तालुक्यात ६४७ हातपंप असून त्यातील ६३० सुरू आहेत़ मात्र पाणीच नसल्याने ४० हातपंप बंद आहेत़ ३५ हातपंप नादुरुस्त आहेत़ नादुरुस्त हातपंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाने सुरु केले आहे़ धानोरा सी़ व मारेगाव (वरचे) या दोन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे़ त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे़

Web Title: Water pressure to 50 villages in the Kinka taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.