अवकाळी पावसाने रब्बी हंगामावर पाणी; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:49 AM2021-02-20T04:49:59+5:302021-02-20T04:49:59+5:30

नायगाव तालुक्यातील गडगा परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेच्यासुमारास पावसाचा जोर वाढला. या अवकाळी पावसाने ...

Water on rabi season with unseasonal rains; Farmers in crisis | अवकाळी पावसाने रब्बी हंगामावर पाणी; शेतकरी संकटात

अवकाळी पावसाने रब्बी हंगामावर पाणी; शेतकरी संकटात

Next

नायगाव तालुक्यातील गडगा परिसरात अवकाळी पावसाने गुरुवारी रात्री उशिरा सुरुवात झाली. शुक्रवारी पहाटेच्यासुमारास पावसाचा जोर वाढला. या अवकाळी पावसाने रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, भुईमूग या पिकांचे नुकसान झाले आहे. यंदाच्या रब्बी हंगामात नायगाव तालुक्यातील गडगा परिसरातील गडग्यासह मांजरम, कोलंबी, दरेगाव, गोदमगाव, अंचोली, नरंगल, मोकासदरा, नावंदी, केदारवडगाव, टेंभुर्णी आदी अकरा गावांत रब्बी ज्वारी २९८, गहू ३८२, हरभरा २३६५ हेक्टर क्षेत्रावर पिकाची पेरणी केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून काबाडकष्ट करीत पिकाची काळजी घेतल्यामुळे पिके बहरली. बहुतांश ठिकाणी हरभरा पीक काढणीची लगबग सुरू झाली आहे. गव्हाचे पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे. रब्बी ज्वारीचे पीक ऐन भरात आहे. हिवाळी भुईमूग काढणीच्या अवस्थेत असून, उन्हाळी भुईमूग पिकाची नुकतीच पेरणी झाली आहे. अशावेळी आलेल्या अवकाळी पावसामुळे उपरोक्त सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे हजारो हेक्टरवर गहू, ज्वारी ही पिके जमिनीवर आडवी पडल्याने तसेच काढणीस आलेला हरभरा भिजून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, नुकसानीची प्रशासनाने पाहणी करून तातडीने मदत करावी, अशी मागणी विश्वनाथ शिंदे, शिवाजी शिंदे (मांजरम), विलास पाटील, उमाकांत कोंडलवाडे, तिरूपती भाकरे (गडगा), तिरूपती पा. वडजे (गोदमगाव), बापूराव घंटेवाड (मोकासदरा), संतोष जाधव, जगन्नाथ जाधव (केदारवडगाव), विष्णू पा. वडजे, शिवाजी पा. वडजे (टेंभुर्णी) आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Water on rabi season with unseasonal rains; Farmers in crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.