हदगावमध्ये ऐन दिवाळीत पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 11:44 PM2018-11-11T23:44:14+5:302018-11-11T23:44:51+5:30
शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़
हदगाव : शहरातील नळयोजनेच्या विंधन विहिरीला पाणी नसल्याने शहराला आठवड्यापासून पाणी मिळत नाही़ शहरवासियांसाठी ही दिवाळी स्मरणात राहणारी ठरली़ कारण पाणी शोधण्यासाठी घराबाहेर पडावे लागले़ त्यानंतरच दिवाळीचे अभ्यंगस्रान करावे लागले़
नोव्हेंबर महिन्यात नदीला पाहिल्याच आठवड्यामध्ये रबीसाठी पाणी सोडले जाते़ त्यामुळे शहराचीही तहान भागते मात्र यावर्षी अनेक ठिकाणी कामे सुरू असल्यामुळे पाणी सोडता आले नाही़ शहराची तहान भागविण्यासाठी राखीव असलेले पाणी नगरपालिकेला जतन करता आले नाही़ यामुळे गोंधळ उडाला़ ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ ज्यांच्याकडे पाण्याची पर्यायी व्यवस्था नाही़ ते दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणत आहेत़ सकाळी फराळ पाण्याचा आनंद घेण्याऐवजी फराळ घरात असूनही पाण्याअभावी तो खाता आला नाही़ पाणी भरल्यानंतरच दुपारी त्यांना सण साजरा करता आला़
नदीला पाणी सोडले तरीही पाण्याचा प्रवाह कमीच ठेवावा लागत असल्यामुळे पाणी शहरापर्यंत पोहचण्यासाठी ११ नोव्हेंबर उजाडणार आहे़ त्यानंतर १२ नोव्हेंबरला नळाला पाणी येण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़ शहरातील जनतेची तहान भागविण्यासाठी ही योजना सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा हदगाव शहरालाही टँकरद्वारे पाणी पुरवर्ठा करण्याची वेळ नगरपालिकेवर येणार आहे़
विकासकामे करण्यासाठी मी- तू करणारे नगरसेवक पाण्याच्या नियोजनासाठी एक शब्दही बोलण्यास तयार नाहीत़ तर विरोधक केवळ स्टंटबाजी करताना दिसत आहेत़ आगामी निवडणुकीत पाण्याची समस्या गंभीर होणार आहे़
उन्हाळ्याची चिंता आतापासूनच
- हिवाळ्यामध्ये सुरूवातीलचा शहरवासियांना पाणी टंचाई भासल्याने उन्हाळ्यात काय होईल, याची चिंता महिलावर्गांना लागली आहे़ शहरातील रखडलेली पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत करण्यासाठी नगराध्यक्षा ज्योती राठोड यांनी प्रयत्न केले़ त्यासाठी वाढीव निधी मिळाल्याचेही सांगण्यात आले़ मात्र योजनेचे काम अद्याप सुरू झाले नाही़
- ऐन दिवाळी सणालाच पाण्याची टंचाई सुरू झाली़ नागरिकांना दत्ताबर्डी तांडा येथील शेतातून पाणी आणावे लागले़