पाण्याच्या नासाडीला लागला ब्रेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:17 AM2021-03-28T04:17:08+5:302021-03-28T04:17:08+5:30
रुग्णांना सुविधा द्या नांदेड, मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांवरील उपचार व अद्यावत सुविधा सुरळीत करून रुग्णांना तातडीची रुग्णसेवा ...
रुग्णांना सुविधा द्या
नांदेड, मुखेड येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांवरील उपचार व अद्यावत सुविधा सुरळीत करून रुग्णांना तातडीची रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे नांदेड जिल्हा महाराष्ट्र पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे. कोरोनाशी संबंधित सर्व चाचण्या, औषध पुरवठा आणि अद्ययावत यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
पेडगे यांची नियुक्ती
नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने प्रा. डॉ. सुदर्शन पेडगे यांची रिसर्च सुपरवाझर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्राणीशास्त्र या विषयातील पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे. पेडगे यांची गाईड म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षणस्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.
सीमावर्ती भागातून दारूची तस्करी
नांदेड, जिल्ह्यात लॉकडाऊन लावल्याने सर्वच वाईनशॉप आणि दारू दुकाने बंद आहेत. परंतु, मद्यपी आपले सोर्स वापरून दारू मिळवत आहेत. त्यातच भोकर, बिलोली, किनवट, माहूर आदी तालुक्यातील तेलंगणा, कर्नाटका राज्यातून दारूची आयात केली जात आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातून येणाऱ्या वाहनांसह अंतर्गत रस्त्यावर चौक्या उभारण्याची गरज आहे.