माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 12:26 AM2019-04-06T00:26:19+5:302019-04-06T00:28:32+5:30

शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water supply after ten days in the mahur | माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

माहुरात दहा दिवसांआड पाणीपुरवठा

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील नागरिकांसह भाविक त्रस्त पाणीपुरवठ्यासंदर्भात उपाययोजना करण्याची मागणी

श्रीक्षेत्र माहूर : शहराला लागून गेलेल्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात भरपूर पाणी असूनही पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहरवासीयांसह भाविकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. शहरात नळाद्वारे दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत़
शहरात सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेल्या मुख्याधिकारी विद्या कदम यांनी पाणीटंचाई जाणवू नये म्हणून प्रयत्न करत नदीत पाणी नसेपर्यंत मेरुवाळा तलावातून आठ ते दहा दिवसांआड पाणी पुरविले़ नदीत पाणी येताच मोटार जळणे पाईपलाईन फुटणे, तसेच पाणी पुरत नसल्याचे कारण दाखवून ९४ पैकी फक्त मजीर्तील ४ वॉल्व्हला दिवसभरात पाणी सोडणे इत्यादी प्रकार सुरू झाला. काही काही वॉर्डात पाणी न सोडण्याच्या प्रकारामुळे नगरसेवकही त्रस्त झाले आहेत.
शहरात निर्जळी असल्याने नागरिक नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्याकडे गेले असता त्यांनी आचारसंहिता असल्याचे कारण सांगितले़ निवडणूक लागल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते प्रचारात व्यस्त असून त्यांच्या घरी टँकरने पाणी आणावे लागत आहे़ दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याबद्दल कोणीच शब्द काढायला तयार नाही़ तर दुसरीकडे माहूर येथील नागरिक तलाव, कुंड, स्वच्छ करण्यासाठी, पाणीपातळी वाढावी म्हणून श्रमदानातून गाळ काढत असून असलेले पाणी शहरात वाटपात नगरपंचायत अकार्यक्षम ठरत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे़ शहरातील पाणीप्रश्न निकाली काढण्यासाठी प्रशासनाने योग्य पाऊल उचलणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़
श्रमदानातून काढला गाळ,पवित्र जागमाता कुंडही होणार स्वच्छ
शहरवासियांनी साखळी तयार करून जागमाता कुंडाशेजारी मातृतीर्थ रस्त्यावरील काशीतीर्थ कुंड स्वच्छ व गाळ काढण्यासाठी श्रमदान सुरू केल्याने तलाव, कुंड, झरे पाण्याने खळाळत वाहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ अंबादास श्रीकृष्ण जोशी, वेदाध्ययन ज्ञानपीठ येथील प्रधानाचार्य निलेश वसंत केदार गुरुजी, श्री परशुराम स्थापित संकटमोचन गणपती मंदिर (श्री दत्तयोग आश्रम माहूरगढ) चे महंत कपिले गुरुजी, समाजसेविका प्रणिता जोशी, यांनी विद्यार्थी व मित्र परिवारास सोबत घेत २९ रोजी काशीतीर्थ कुंड स्वच्छतेस सुरुवात केली़ शहरात पहिल्यांदाच पाणी पुरवठ्याच्या पौराणिक स्त्रोतांचे पुनुरुज्जीवन श्रमदानातून होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी येथे भेट देवून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांना ही माहिती दिली. एकलारे बंधूंनी जेसीबी तत्काळ उपलब्ध करून दिला आहे़

Web Title: Water supply after ten days in the mahur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.