टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:14+5:302021-01-02T04:15:14+5:30
दत्त जन्मोत्सव साजरा लोहा : तालुक्यातील साेनखेड येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सवानिमित्त २३ ते ३० डिसेंबरदरम्यान आरती करण्यात ...
दत्त जन्मोत्सव साजरा
लोहा : तालुक्यातील साेनखेड येथील स्वामी समर्थ केंद्रात दत्त जन्मोत्सवानिमित्त २३ ते ३० डिसेंबरदरम्यान आरती करण्यात आली. २९ रोजी दत्त जन्मोत्सव साजरा झाला. ३० रोजी सप्ताहाची सांगता झाली. यानिमित्ताने दुर्गा शप्तशती, मल्हारी शप्तशती, स्वामी चरित्र, नवनाथ भक्तीसार ९०० चे सामुदायिक पारायण करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.
हंबर्डे यांच्या कार्यालयास भेट
नांदेड : सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आ. मोहन हंबर्डे यांच्या वजिराबाद येथील जनसंपर्क कार्यालयास गुरुवारी भेट दिली. यावेळी आ. श्यामसुंदर शिंदे, आ. हंबर्डे, डॉ. सुनील कदम, आ. बालाजी कल्याणकर, राहुल हंबर्डे, नरसिंग हंबर्डे, राजू मोरे, राजेश नावंदीकर, शिवप्रसाद कुबडे, प्रकाश दीपके, राजू हंबर्डे उपस्थित होते.
सुरवसे यांची भेट
देगलूर : ग्रामपंचायत निवडणूूक निरीक्षक मंगेश सुरवसे यांनी ३१ डिसेंबर रोजी देगलूर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार राम पंगे, वसंत नरवाडे उपस्थित होते. तालुक्यात ८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकी होत असून गुरुवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाली.
अवैध वृक्षतोड जोरात
माहूर : माहूर येथील जंगल व परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. सागवान, लिंब, चिंच, रोहन अशा अनेक झाडांची वृक्षतोड होत आहे. इवळेश्वर, लखमापूर, हडसणी, महादापूर, उमरा, वानोळा आदी गावांतून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याच्या तक्रारी आहेत.
फोटो कॅप्शन-
चिखलवाडी, नांदेड येथील नादब्रह्म संगीत विद्यालयाचे उद्घाटन १ जानेवारी रोजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भा.ग. देशपांडे, रमाकांत जोशी, राधिका जोशी (कानोले), सुभाषराव बाऱ्हाळे, अनघा दुबे, विद्यालयाचे संस्थापक अंबादास कानोले, वसंतराव वाळकीकर आदी उपस्थित होते.
पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण
हदगाव : दीनदयाल अंत्योदय योजना नागरी उपजीविका अभियान नगर परिषदेंतर्गत हदगावातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर फेरीवाला, पथविक्रेता यांना ओळखपत्र व व्यवसायाचा अधिकृत परवाना दिला जाणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी विजय येरावार यांनी दिली.
शेख सेवानिवृत्त
नांदेड : विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलाचे माजी संचालक डॉ. शेख अजहर ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, डॉ. वैजयंता पाटील, डॉ. डी.एम. कंधारे, डॉ. घनश्याम येळणे, डॉ. शिवराज बोकडे आदी उपस्थित होते.
मुखेडची आरोग्य यंत्रणा सज्ज
मुखेड : कोरोना लसीकरणासाठी मुखेडची आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी दिली. तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कृती बल गट स्थापन करण्यात आले. लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, आरोग्य सहायक, सहायिका, आरोग्य सेवक आदींचे प्रशिक्षण तहसील कार्यालयात घेण्यात आले.