पार्डीच्या नदीला आले उर्ध्व पैनगंगेचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:55 AM2018-05-24T00:55:19+5:302018-05-24T00:55:19+5:30
बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तरावर बैठक झाली व पार्डी नदीला पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पार्डी : बारा महिने तुंबून वाहणारी पार्डी येथील नदी या वर्षात कोरडी पडल्याने नदीकाठावरील गावांतील विहिरी, बोअर कोरडे पडले होते़ पार्डी परिसरातील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असून जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता़ शासकीय स्तरावर बैठक झाली व पार्डी नदीला पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे नदीकाठावरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे़
पार्डी गावालगत जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत गावतळ्याचे काम करण्यात आले असून या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवण झाली. या तळ्यामुळे गावातील व पार्डी परिसरातील गावांना फायदा होणार आहे़ दोन वर्षांपूर्वी चार बंधारे बांधण्यात आले असून त्यामुळे काही प्रमाणात गावातील विहीर, बोअर याची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ परंतु, मागील काही वर्षांपासून पावसाळा कमी झाल्यामुळे नदी कोरडीच राहिल्याने बंधाऱ्यात पाणी नव्हते़ त्यामुळे गावातील विहीर, बोअर कोरडेच राहिले होते़ मे महिन्याच्या २३ तारखेला नदीच्या पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पार्डी गावासह परिसरातील गावाला याचा फायदा होणार आहे़
पार्डी येथील नदीवर बंधारे बांधण्यात आले असल्याने व नदीच्या पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे खबरदारीचा इशारा देण्यात आला़
गेल्यावर्षी ३० एप्रिल रोजी चार महिला पार्डी नदीच्या बंधाºयात कपडे धुण्यासाठी गेल्या असता एकीचा तोल जाऊन पाण्यात बुडत होती़ तिला वाचविण्यासाठी दुसºया महिला पाण्यात गेल्या़ पण पाणी खोल असल्याची कल्पना नसल्याने चारही महिला पाण्यात बुडाल्या़ त्यामधील दोन महिलांचा मृत्यू झाला होता़ त्यामुळे ग्रामपंचायतने पार्डी गावातील नागरिकांना आवाहन केले असून कपडे धुण्यासाठी नदीपात्रात न उतरण्यास सांगण्यात आले आहे़