आम्ही आमचा हक्क बजावला; नांदेडात ४८ तृतीयपंथीयांनी केले मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 05:50 PM2019-04-18T17:50:26+5:302019-04-18T17:57:17+5:30
नांदेडमध्ये 68 तृतीयपंथी मतदार
नांदेड : शहरात जवळपास ६८ तृतीयपंथी मतदार असून त्यापैकी ४८ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला.
मिलगेट परिसरात शंभराहून अधिक तृतीयपंथी वास्तव्यास असून त्यापैकी ६८ जण मतदार आहेत.
आज दुपारपर्यंत ४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. लोकशाही बळकटीकरण आणि आपल्या हक्कासाठी सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन तृतीयपंथी मतदारांनी केले.
प्रतिक्रिया :
मी मतदान करून माझा हक्क बजावला, तुम्ही पण मतदान करा आणि लोकशाही बळकट करा.
- तुतीयपंथी गुरु
मतदान म्हणजे नागरिकाला आपली जबाबदारी पार पाडण्याची लोकशाहीने दिलेली सगळ्यात सोपी आणि सगळ्यात महत्त्वाची संधी होय. आज आम्ही हे कर्तव्य बजावले. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- रक्षिता बकश
आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावलाय. आपणही मतदान करून आपला हक्क बजवा. सशक्त भारतासाठी प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य पार पडावं.
- अर्चना शानुर बकश
देशाच्या विकासासाठी सर्वात जास्त संख्येन मतदान करा. -
- अंजली शानुर बकश