सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:43 AM2021-01-13T04:43:34+5:302021-01-13T04:43:34+5:30
दोन अनोळखींचे मृतदेह आढळले नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनोळखींचे मृतदेह आढळून आले आहेत. मयत महिलेची उंची १५५ ...
दोन अनोळखींचे मृतदेह आढळले
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अनोळखींचे मृतदेह आढळून आले आहेत. मयत महिलेची उंची १५५ सेंमी असून रंग सावळा, वय अंदाजे ३५ वर्षे, गुलाबी पांढरी पिवळी साडी असे महिलेचे वर्णन आहे, तर पुरुषाची उंची १७० सेंमी असून वय अंदाजे ५० वर्षे, पांढऱ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, शर्टवर गोहेल टेलर शेगाव असे लिहिलेले आहे. या प्रकरणात ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
राजमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती साजरी
नांदेड : राजीव गांधी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रमेश कदम हे होते. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
गावठी कट्टा घेऊन फिरणारा अटकेत
नांदेड : गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले आहे. ११ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. वसंतनगर चौकात हा आराेपी कट्टा घेऊन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात पोना. शेख लियाकत जैनोद्दीन यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण
शहरातील वसंतनगर भागात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका मजुराला मारहाण करण्यात आली. ही घटना ७ जानेवारी रोजी घडली. भोला रामकिशन गोकुलवाले हे वसंतनगर भागात थांबलेले असताना आरोपीने जुन्या भांडणाच्या कारणावरून त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.