नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:48 PM2020-08-21T19:48:35+5:302020-08-21T19:50:05+5:30

दाभोळकरांच्या सात तर पानसरेंच्या हत्येला पाच वर्षे उलटूनही प्रगती नाही

What about the investigation into the murder of Narendra Dabholkar - Govind Pansare ? | नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ? 

नरेंद्र दाभोलकर- गोविंद पानसरे हत्येच्या तपासाचे काय ? 

googlenewsNext
ठळक मुद्देसुशांतसिंह मृत्यू; तपासाला आता किती वर्षे घेणार?

नांदेड : सिनेअभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण अर्थात सीबीआयकडे सोपविण्यात आला, हे चांगलेच आहे. परंतू समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांचे हत्या प्रकरण सीबीआय सात वषार्पासून हाताळत आहे. या दोन्ही प्रकरणात सीबीआयने काय दिवे लावले, तपासाचे पुढे काय झाले, असा संतप्त सवाल विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी उपस्थित केला आहे.

बुद्धीवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अनिष्ठ रुढी, परंपराविरोधात आयुष्यभर लढा दिला. समाजातील अनेक भोंदू बाबांचे त्यांनी पितळ उघडे पाडले. अशा  समाजसुधारकाची एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेल्या माथेफिरूंनी २० आॅगस्ट २०१३ रोजी सकाळी पुण्यात गोळ्या झाडून हत्या केली. दाभोळकर यांच्या हत्येनंतर दिडच वर्षात महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते कॉ. गोविंदराव पानसरे यांचीही याच विचारधारेच्या व्यक्तींकडून कोल्हापुरात १६ फेब्रुवारी २०१५  रोजी सकाळी गोळीबार करून हत्या करण्यात आली. या दोघांच्या हत्येमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. या असंतोषाचे परिणाम राजकारणावरही झाले.  

सीबीआयने दाभोलकर-पानसरे या दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास स्वत:कडे घेतला. आता यातील पहिल्या घटनेला सात वर्षे तर दुसऱ्या घटनेला पाच वर्षे झाली असून सीबीआय तपासात काहीही प्रगती झालेली नाही. ही दोन्ही प्रकरणे हातावर असतांना आता  सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपविण्यात आल्याचे सांगत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला, हे चांगलेच झाले. पण अगोदरच सीबीआयकडे सोपविलेल्या दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासाचे काय? याचा तपास अद्यापही गुलदस्त्यातमध्ये का आहे? असा संतप्त सवाल विधान परिषदेतील प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर यांनी उपस्थित केला आहे. आधी दाभोलकर-पानसरेंच्या मारेकऱ्यांना शोधून काढा, मगच सुशांतसिंह आत्महत्येचे प्रकरण हाताळा, अशी मागणीही आ. राजूरकर यांनी केली आहे.

सुशांतसिंह मृत्यू; तपासाला आता किती वर्षे घेणार?
सुशांतसिंहच्या तपासाला आता अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येला आता दोन महिने झाले. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंहच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयकडे वर्ग करण्यास मंजूरी दिली. आता सीबीआय या प्रकरणाचा तपास करायला आणखी किती वर्षे लावील याचा नेम नाही. अभिनेता सुशांतसिंह याच्या आत्महत्येला आता दोन महिने झाले. या काळात राजकारण चांगलेच शिगेला गेले़ त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यास मंजूरी दिली. आता या तपासाला सीबीआय किती वर्षे घेणार असा सवालही राजूरकर यांनी केला.
 

Web Title: What about the investigation into the murder of Narendra Dabholkar - Govind Pansare ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.