मोबाइल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:22 AM2021-06-09T04:22:50+5:302021-06-09T04:22:50+5:30
नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात ...
नांदेड : कोरोनाच्या महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यात रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली होती; परंतु अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंदच होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मोबाइल विक्रीसह दुरुस्तीची दुकानेही बंद होती. त्यामुळे मोबाइल नादुरुस्त झालेल्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात घरातच अडकून पडल्याने मोबाइलचा वापर वाढला होता.
त्यातही ऑनलाइन कामकाज आणि शिक्षणही मोबाइलवरच सुरू होते. मोबाइलच नादुरुस्त झाल्याने अनेकांना हात मोडल्यासारखे झाले होते. आजच्या स्पर्धेच्या युगात मोबाइल ही अत्यावश्यक वस्तू झाली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातच असल्याने नेटचा वापरही वाढला होता. दिवसभर मोबाइलवरच मनोरंजन करण्याशिवाय पर्याय नव्हता. अतिवापरामुळे मोबाइलची बॅटरी खराब होणे, स्क्रीन गार्ड जाणे, स्पिकरमध्ये आवाज स्पष्ट न येणे, यासह पाण्याचा संपर्क आल्यास स्क्रीनवर काहीच न दिसणे, अशा प्रकारच्या अडचणी आल्या होत्या. आता गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे मोबाइल दुरुस्तीसाठी मोठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. एवढे दिवस दुकान बंद असल्यामुळे ग्राहक अडकून पडले होते. आता गर्दी होत असल्याने मोबाइल शॉपी चालक सकाळी दुकाने लवकर उघडत आहेत.
कारण काय?
n अतिवापर आणि वारंवार चार्ज केल्यामुळे बॅटरी खराब होण्याचे प्रमाण वाढले.
n स्क्रीन गार्ड खराब झाले.
n लहान मुलांनी गेम पाहताना भांडण केल्याने मोबाइल खाली पडला, त्यामुळे त्याची बॉडी बदलणे.
n पाण्याशी संपर्क आल्यामुळे स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक होणे.
n चार्जिंग पॉइंट खराब होणे.
n मोबाइलमधून स्पष्टपणे आवाज न येणे. यासारखी दुरुस्तीचे कारणे आहेत.