निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सहज होत आहे उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:12 AM2021-07-23T04:12:52+5:302021-07-23T04:12:52+5:30
खबरदारी आवश्यक संभाव्य कोरोनाची तिसरी लाट धोकादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी आवश्यक आहे. निर्बंधांचे सर्वांनी पालन करावे. ज्याद्वारे स्वत:चे ...
खबरदारी आवश्यक
संभाव्य कोरोनाची तिसरी लाट धोकादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी आवश्यक आहे. निर्बंधांचे सर्वांनी पालन करावे. ज्याद्वारे स्वत:चे व कुटुंबीयांचे संरक्षण करणे शक्य होणार आहे.
- डॉ. विपिन इटनकर, जिल्हाधिकारी
खबरदारी आवश्यक
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत व्यवहारांना मुभा आहे. ४ नंतर दुकाने बंद करावीत, असे निर्देश आहेत. तर शनिवार, रविवार पूर्ण व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणतीही यंत्रणा सरसावत नसल्याचे जिल्हाभरात चित्र आहे.
किराणा हवा की जेवण?
निर्बंधाची वेळ झाल्यानंतर शहरातील जुनामोंढा, वजिराबाद, तारासिंह मार्केट, कलामंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर, आयटीआय, तरोडा, छत्रपती चौक, चौफाळा आदी भागांतील सर्व सुरूच आहेत. किराणा दुकाने, हॉटेल, जनरल स्टोअर्स सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे शनिवारी, रविवारीही बाजारपेठ उघडीच राहत आहे.