अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:47 IST2019-01-21T00:46:24+5:302019-01-21T00:47:45+5:30

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ...

The wheels of the atom | अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या

अट्टल दरोडेखोराच्या मुसक्या आवळल्या

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाईलोहा तालुक्यातील दरोड्याचा यशस्वी तपास

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील माळाकोळीसह नाशिक जिल्ह्यात दरोडा टाकणाऱ्या टोळीतील अट्टल दरोडेखोराला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे़ त्याने दोन्ही ठिकाणच्या दरोड्याची कबुली दिली आहे़
१४ जून २०१८ रोजी पहाटे सव्वा तीन वाजेच्या सुमारास माळाकोळी येथील नागनाथ शिवाजी बुळगुंडे यांच्या घरावर दरोडा टाकण्यात आला होता़ यावेळी दरोडेखोरांनी नागनाथ बुळगुंडे यांची आई आणि बहिणीजवळील मंगळसूत्र, कर्णफुले व दोन मोबाईल असा एकूण ५३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ सदरील दरोडा हा परभणी येथील एका आरोपीने टाकल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती़ त्यानंतर खबºयाकडून माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी येथील रोशनसिंग जुन्नी याला ताब्यात घेतले़ त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली़ तसेच नाशिक जिल्ह्यात येवला हद्दीतही दरोडा टाकल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली़
जुन्नी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध परभणी, बाळापुर स्थित असलेल्या मोठ्या तलावातील काळी माती तेलंगणातील वाढवणा व येळवत शिवारातील काही वीट कारखानदार चोरट्या मार्गाने रात्रीला घेऊन जात जालना आणि नांदेड जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत़ पोनि़ सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पांडुरंग भारती, पोकॉ़ ब्रह्मा लामतुरे, शेख जावेद, शेख अलीम, व्यंकट गंगूलवार, शंकर केंद्रे यांनी ही कारवाई केली़
दरम्यान, या आरोपीकडून जिल्ह्यात आणखी काही ठिकाणी दरोडे टाकलेत का, हेही उघड होणार आहे़

Web Title: The wheels of the atom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.