नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार - मनसेचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:38+5:302021-01-08T04:53:38+5:30

शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मणक्याच्या आजाराने त्रासले असून प्रवाशांचे बेहाल होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...

When will Nanded city be pit-free - MNS question | नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार - मनसेचा सवाल

नांदेड शहर खड्डेमुक्त कधी होणार - मनसेचा सवाल

googlenewsNext

शहरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मणक्याच्या आजाराने त्रासले असून प्रवाशांचे बेहाल होत आहेत. तसेच खड्ड्यांमुळे शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शहरातील रस्ते खड्डेमय झाले असून जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत, याकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शहरातील नागरिकांना खड्ड्यांतून केव्हा मुक्त करणार तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेचा आलेला निधी इतरत्र वळविला तर गाठ मनसेशी आहे, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. २०१९-२० मधील दलित वस्त्यांच्या कामामधील भ्रष्टाचार करून निधी इतरत्र वळवून दलित जनतेस विकासाच्या नावावर थट्टा व फसवणूक करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर ॲट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करावेत, अन्यथा मनसे कायदेशीर लढाई लढण्यास तयार आहे, असेही आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

जिल्हाध्यक्ष मॉटीसिंघ जहागीरदार यांच्या आदेशानुसार मनसे शहराध्यक्ष अब्दुल शफीक यांच्या नेतृत्वाखाली मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुभाष भंडारे, शक्तिसिंघ परमार, रवी राठोड, संतोष सुनेवाड, महेश ठाकूर, अनिकेत परदेशी, श्रीनिवास एडके आदी उपस्थित होते.

Web Title: When will Nanded city be pit-free - MNS question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.