'संचारबंदी असताना कुठे फिरताय'; तोतया पोलिसाने धमकावत दागिन्यांची केली लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 12:54 PM2021-04-09T12:54:58+5:302021-04-09T12:57:00+5:30

तेलंगणा राज्यातील बसवंत सोमावार यांनी गुरुवारी दुपारी मुलाचं लग्न असल्याने देगलूर येथून सव्वा लाख रुपये किंमतीचा अडीच तोळ्याचा पोहेहार एका सराफा व्यापाऱ्याकडून विकत घेतला होता.

'Where to go when there is a curfew'; fake police looted jewelery by threatening | 'संचारबंदी असताना कुठे फिरताय'; तोतया पोलिसाने धमकावत दागिन्यांची केली लूट

'संचारबंदी असताना कुठे फिरताय'; तोतया पोलिसाने धमकावत दागिन्यांची केली लूट

googlenewsNext

नांदेड : जिल्ह्यातील देगलूर येथे तोतया पोलिस बनून चोरट्यानं अडिच तोळ्याच्या सोन्याच्या पोहेहारावर हात साफ केलाय... ही घटना गुरुवारी भरदिवसा घडल्यानं खळबळ उडालीय. ही घटना सिसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी चोरटयांचा तपास सुरू केला आहे .

तेलंगणा राज्यातील बसवंत सोमावार यांनी गुरुवारी दुपारी मुलाचं लग्न असल्याने देगलूर येथून सव्वा लाख रुपये किंमतीचा अडीच तोळ्याचा पोहेहार एका सराफा व्यापाऱ्याकडून विकत घेतला आणि ते घराकडे परतत असताना तोतया पोलिसाने सोमावार यांना अडवून लाॅकडाऊन आहे कुठे फिरताहेत, तोंडाला मास्क नाही, आधारकार्ड दाखवा म्हणून चौकशी केली. घाबरलेल्या सोमावार यांनी सोन्याचा दागिना घेण्यासाठी आलो होतो असे सांगितले. यावर तु खोटं बोलत आहेस म्हणून तोतया पोलिसाने चल पोलिस ठाण्यात असं सांगून गाडीवर बसवून दुसरीकडेच घेऊन गेला. संधी मिळताच सोमावार यांच्या जवळील सोन्याचा पोहेहार घेऊन पसार झाला. या प्रकरणी देगलूर पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
 

Web Title: 'Where to go when there is a curfew'; fake police looted jewelery by threatening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.