किनवटच्या आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थाकाची अहेरीला बदली नवे अधिकारी कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:19 AM2021-01-03T04:19:03+5:302021-01-03T04:19:03+5:30
किनवट : किनवट येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांची अहेरी ...
किनवट : किनवट येथील महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक बी. एस. बरकमकर यांची अहेरी येथील उपप्रादेशिक व्यवस्थापक म्हणून नुकतीच प्रशासकीय बदली झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून बरकमकर यांनी किनवट येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापक म्हणून पदभार सांभाळला आहे. त्यांच्या काळात भरडधान्य खरेदी योजना प्रभावीपणे राबविण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून पहिल्यांदाच किनवट तालुक्यात भात खरेदी केंद्र मंजूर झाले असून एक हजार क्विंटल भाताची (धान) खरेदी करण्यात आली आहे. त्यांनी शबरी आदिवासी वित्त व विकास कार्यालयाच्या शाखा व्यवस्थापकाचा प्रभारी पदभार सांभाळला आहे. त्यांच्या बदलीने उपप्रादेशिक व्यवस्थापक पद रिक्त झाले आहे. त्यांच्या रिक्त जागेचा प्रभारी पदभार उपव्यवस्थापक डी. एल. नैताम यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ऐन भरडधान्य खरेदीच्या काळात बदली झाल्याने हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत भरडधान्य खरेदीला ब्रेक बसण्याची शक्यता आहे.