हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाची जबाबदारी काेणाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:20+5:302021-08-18T04:24:20+5:30
अनलाॅक प्रक्रियेत हाॅटेल सुरू करून कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, किती कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, याची तपासणी करणार ...
अनलाॅक प्रक्रियेत हाॅटेल सुरू करून कर्मचाऱ्यांचे लसीकरण बंधनकारक केले आहे. मात्र, किती कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले, याची तपासणी करणार काेण? हाच प्रश्न पुढे आला आहे. शहरातील हाॅटेल व्यवसाय काेराेना संकटामुळे उद्ध्वस्त झाला आहे. आता कुठे परवानगी मिळाल्याने हाॅटेल सुरू करण्यात येत आहेत. त्यात अटी व शर्ती किचकट ठरत आहेत.
कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्णत्वाकडे
काेराेनामुळे संकटात सापडलेल्या हाॅटेल व्यवसायाला आता सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. जवळपास दीड वर्ष व्यवसाय ठप्प हाेता. सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
- सुरेश राठाेड, अध्यक्ष, हाॅटेल व्यावसायिक संघटना, नांदेड
मनपाची पथके तपासणी करणार
काेराेनाचा धाेका अद्याप टळला नाही. त्यामुळे प्रत्येकाने काेराेना नियमावलींचे पालन करणे आवश्यक आहे. याबाबात सर्व आदेश निर्गमित केले आहेत. महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायतीकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जात आहे.
- डाॅ. विपीन इटनकर, जिल्हाधिकारी
रस्त्यांवर टपऱ्यांवर आनंदीआनंद
काेराेना कालावधीत सार्वजनिक ठिकाणावरील गर्दी टाळण्यासाठी सर्व व्यवसायावर बंदी घातली हाेती. आता व्यवहार सुरू झाले आहेत.
लसीकरणही बंधनकारक केले जात आहे; परंतु गर्दीचे ठिकाण असलेल्या पानटपरी, चहा ठेले, भाजीपाला विक्रेते यांचे लसीकरण झाले की नाही, हे पाहण्यासाठी या घटकांची तपासणी गरजेची आहे.
भाग्यनगर
काेराेनावर लस हेच प्रभावी औषध आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आम्हीही कर्मचाऱ्यांना आग्रह धरत आहाेत. कर्मचारीही लस घेत आहेत. जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे.
आनंदनगर
आता कुठे व्यवसाय पूर्वपदावर येत आहे. कर्मचारीही हळूहळू कामावर येत असताना लसीकरणाची अट टाकली आहे. लस आवश्यकच आहे. ती सर्व कर्मचाऱ्यांना दिली आहे.