माझ्याकडे बघून का हसला? रागाच्याभरात कोयत्याचे वार करून फळ विक्रेत्याचा हात छाटला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 11:33 AM2023-08-18T11:33:04+5:302023-08-18T11:49:59+5:30

नांदेडमध्ये पुन्हा थरार..महिनाभरात हात छाटण्याची दुसरी घटना घडली

Why did you laugh at me? In a fit of anger, the fruit seller's hand was chopped off by the blow of the coyote | माझ्याकडे बघून का हसला? रागाच्याभरात कोयत्याचे वार करून फळ विक्रेत्याचा हात छाटला

माझ्याकडे बघून का हसला? रागाच्याभरात कोयत्याचे वार करून फळ विक्रेत्याचा हात छाटला

googlenewsNext

- अविनाश पाईकराव 
नांदेड :
माझ्याकडे पाहून का हसतोस या क्षुल्लक कारणावरून एका फळ विक्रेत्याचा कोयत्याने हात छाटल्याची धक्कादायक घटना शहरातील डी मार्ट परिसरात बुधवारी घडली आहे. विशेष म्हणजे महिनाभरात हात छाटण्याची ही दुसरी घटना आहे.

मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज असे जखमी फळ विक्रेत्याचे नाव असून, त्याच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. बुधवारी तो डी मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आद्रक, लसूण विक्रीसाठी गेला होता. शेजारी असणाऱ्या फळ विक्रेत्यासोबत मोहम्मद अझहर याचा वाद झाला होता. हा  वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास मोहम्मद अझहर याच्याजवळ येऊन त्याच्यावर कोयत्याने वार केले. मोहम्मद अझहर मोहम्मद अजीज याचा एक हात मनगटापासून छाटला तर दुसऱ्या हाताला देखील गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली.

 दरम्यान, जखमी मोहम्मद अझहर यास खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका युवकाचा हात मनगटापासून वेगळा केल्याची घटना घडली होती. आता ही दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Why did you laugh at me? In a fit of anger, the fruit seller's hand was chopped off by the blow of the coyote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.