भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:18 AM2021-03-17T04:18:27+5:302021-03-17T04:18:27+5:30

नांदेड : महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल टाकताना दुर्लक्ष करणारे ग्राहक, भाजीपाला मात्र तोलून मापून घेतात. ...

Why does a customer weighing vegetables ignore the petrol pump? | भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

भाजीपाला तोलूनमापून घेणारा ग्राहक पेट्रोल पंपावर दुर्लक्ष का करतो?

Next

नांदेड : महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या बहुतांश पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल टाकताना दुर्लक्ष करणारे ग्राहक, भाजीपाला मात्र तोलून मापून घेतात. त्यातच पेट्रोल पंपावर मोफत मिळणाऱ्या सुविधांबाबत ग्राहक अनभिज्ञ असल्याने, त्याचा फायदा घेत पंप चालकांकडून मोफत हवा, पाणी अथवा शौचालयाचीही व्यवस्था केली नाही, असे चित्र अनेक पंपांवर पाहायला मिळते.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीत जवळपास १८ पेट्रोल पंप येतात. दररोज या ठिकाणी जवळपास एक लाख लीटर पेट्रोल आणि डिझेलची विक्री होते. शहरात दुचाकींची संख्या लाखात असल्याने पेट्रोलची विक्री अधिक आहे. जवळपास ६५ हजार लीटर पेट्रोल तर ३० ते ३२ हजार डिझेलची दररोज विक्री होत असते. लाॅकडाऊनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्रीलाही फटका बसला आहे. दरम्यान, पेट्रोल डिझेलच्या मापात पाप करणारे अनेक जण आजही आहेत, परंतु ग्राहकही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत, असे चित्र आहे. मागील वर्षभरात शहरातील एकाही पेट्रोल पंपासंदर्भात लेखी तक्रार वैधमापन विभागाकडे आलेली नाही, तर वजन व मापे तपासणी कार्यालयाकडून वर्षभरातून एकदा पंपाची रितसर तपासणी केली जाते, त्याशिवाय त्यांचे ऑडिट होत नसल्याचे सांगण्यात येते. सदर तपासणी करताना पंप मालक, सेल्स ऑफिसर, फिटर आदींची उपस्थिती असते.

वर्षभरात एकही तक्रार नाही

मागील वर्षभरात पेट्रोल, डिझेलच्या मापात पाप केले, म्हणून एकाही ग्राहकाने तक्रार केलेली नाही.

शहरातील एका पेट्रोल पंपासंदर्भात वर्षभरापूर्वी तक्रारी आल्या होत्या, परंतु तपासणीत काहीही तफावत आढळली नाही.

ग्राहकांकडून गर्दीत लवकर पेट्रोल टाकण्याच्या प्रयत्नात झीरो बघण्याकडे होते दुर्लक्ष.

वैधमापन विभागाच्या वतीने पंपाची वर्षातून एक वेळ तपासणी करण्यात येते. त्यानंतर, स्टॅम्पिंग होते. तसे केले नाही, तर पेट्रोल पंप चालकास पेट्रोल, डिझेलची विक्रीच करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक जण तपासणी करून घेतो.

ग्राहकांनी अशी घ्यावी काळजी

पेट्रोल, डिझेल टाकत असताना, ग्राहकांनी सदर मशीनवर झीरो आहे का ते तपासावे. इंधन भरत असताना, गाडी बंद करावी, जेणेकरून लक्ष विचलित होणार नाही, तसेच इंजिन चालू असताना इंधन भरताना दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंजिन बंदच करावे. रीडिंग पाहून सेल्समनला पैसे द्यावेत.

वर्षभरात एकही तक्रार नाही. सध्या इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन बसविण्यात आल्याने, मापात माप करण्याचा प्रश्नच उरला नाही, परंतु हात चालाकी होऊ नये, म्हणून ग्राहकांनी सतर्क राहून इंधन भरावे.

- दिगांबर पोरडवार, निरीक्षक, वैधमापन विभाग, नांदेड

पेट्रोल पंप १८

पेट्रोल - ६५,०००

डिझेल - ३२,०००

Web Title: Why does a customer weighing vegetables ignore the petrol pump?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.