पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:15 AM2018-02-18T00:15:17+5:302018-02-18T00:15:25+5:30
पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील महाजनपेठ येथे घडली. लक्ष्मीकांत माधवराव नारलावार (वय ४०) असे मयताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुखेड : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने विषारी औषध पिवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील महाजनपेठ येथे घडली. लक्ष्मीकांत माधवराव नारलावार (वय ४०) असे मयताचे नाव आहे.
१६ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान पेपर आणण्यासाठी म्हणून लक्ष्मीकांत हे घराबाहेर पडले, मात्र दुपारी १ वाजेच्या दरम्यान लक्ष्मीकांत यांनी विषारी औषध प्राशन केल्याचा निरोप मोंढ्यातील एका कृषी दुकानदाराने दिला. दरम्यान, उपचारासाठी लक्ष्मीकांत यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताच्या खिशात चिठ्ठी सापडली. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद करुन या प्रकरणाला लक्ष्मण अंबादास पेडगूलवार, पत्नी, राम अंबादास पेडगूलवार, दत्तात्रय अंबादास पेडगूलवार, अनिता राम पेडगूलवार, दैवशाला पेडगूलवार जबाबदार असल्याचा आरोप केला. पोलिसांनी यातील पत्नीस अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. इतर आरोपी फरार झाले. पोनि संजय चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ओमकार गिरी तपास करीत आहेत.
नातेवाईकांनी आरोपीला घातले पाठीशी
४मयताचा भाऊ श्रीनिवास नारलावार यांनी मुखेड पोलिसांत फिर्याद दिली. आरोपी लक्ष्मण अंबादास पेडगूलवारसोबत माझ्या भावजयीचे मागील दीड वर्षांपासून अनैतिक संबंध असून, यासंदर्भात आरोपी व त्याच्या नातेवाईकांना वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हालाच धमकावण्यात आले. दोघे राजी असतील तर आम्ही काय करावे? असे म्हणत नातेवाईकांनी आरोपीची पाठराखण केली. १५ फेब्रुवारी रोजी भाऊ लक्ष्मीकांत याने आरोपीच्या घरी जावून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी भावालाच धमकावण्यात आले. एकूणच हा प्रकार लक्ष्मीकांत यांना सहन झाला नाही.