अशा होणार स्वारातीमच्या उन्हाळी परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 07:27 PM2020-10-05T19:27:49+5:302020-10-05T19:28:30+5:30
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी पदवी, पदव्युत्तर, पदविका व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १९ ऑक्टोबरपासून तर पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा दि. १५ ऑक्टोबरपासून सुरू होतील.
तीन वर्षीय पदवी (बी.ए .,बी.कॉम.,बी. एस्सी.) या अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या परीक्षा १९ ते ३१ ऑक्टोब दरम्यान घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नसंच देवून होतील. पदव्युत्तर व व्यावसायिक दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या, तीन वर्षीय व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या, चार वर्षीय पदवी अभ्यासक्रमाच्या सातव्या व आठव्या सत्राच्या आणि पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या नवव्या व दहाव्या सत्राची परीक्षा १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान होईल. बहिस्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेशित विद्यार्थांच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा दि. २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान होतील.
पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या बॅकलॉगसाठीच्या तिसऱ्या व चौथ्या सत्राच्या परीक्षा ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान तसेच पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या बॅकलॉग परीक्षा २१ ते २८ ऑक्टोबर दरम्यान त्यांच्या महाविद्यालयीन स्तरावर होतील. बॅकलॉगच्या परीक्षासुद्धा बहुपर्यायी प्रश्नसंचद्वारे घेण्यात येणार आहेत.