महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:23+5:302021-03-19T04:17:23+5:30

जिल्हाध्यक्षपदी काटे उमरी - नांदेड जिल्हा गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उल्हासराव काटे यांची निवड झाली. यावेळी काटे म्हणाले की ...

Woman commits suicide | महिलेची आत्महत्या

महिलेची आत्महत्या

Next

जिल्हाध्यक्षपदी काटे

उमरी - नांदेड जिल्हा गोंधळी समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी उल्हासराव काटे यांची निवड झाली. यावेळी काटे म्हणाले की समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तरुण पिढीने शिक्षण, उद्योग आदी क्षेत्रात येण्याची गरज आहे.

ऊस जळाला

लोहा - तालुक्यातील रामदास तांडा येथील मुक्ताबाई पवार यांच्या शेतातील दीड एकर ऊस जळून खाक झाला. सोनखेड पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे. घटनास्थळाला तहसीलदार परळीकर, महावितरणचे वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक परिहार यांनी भेट देऊन पंचनामा केला.

रवी ढगे यांना पुरस्कार

लोहा - मारतळा ता.लोहा येथील जि.प.कें.प्रा.शाळेचे उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांना साटोडा, ता.वर्धा येथील बाल रक्षक प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या राज्यस्तरीय शाळास्नेही बालरक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. लवकरच एका कार्यक्रमात हा पुरस्कार दिला जाणार आहे.

पाटील यांचा सत्कार

निवघा - मध्य प्रदेश सरकारच्या कौशल्य विकास व रोजगार महामंडळावर अध्यक्ष म्हणून श्रीकांत पाटील यांची निवड झाली. पाटील हेनिवघा येथे आले असता त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शरद पाटील, उपसरपंच श्याम पाटील, माजी सभापती बालासाहेब कदम, भीमराव कदम, बबनराव कदम, भीमराव देशमुख, शिवाजी देशमुख, अमोल पाईकराव आदी उपस्थित होते.

विवाहितेचा छळ

बिलोली - प्लॉट घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये घेऊन ये असे म्हणून विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या मंडळीविरुद्ध बिलोली पोलिसांनी गुन्हा नाेंदवला. गेल्या तीन वर्षपासून हा प्रकार सुरू होता असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत नमूद केले.

वसुलीसाठी सहकार्य करा

हिमायतनगर - शहरवासियांनी करवसुलीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डी.एन. गायकवाड यांनी केले. शहरात सध्या घरपट्टी, पाणीपट्टी वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायतकडून पाणीपुरवठा, दिवाबत्तीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.

सुरेश ढगे यांची नियुक्ती

नायगाव - शिवसेना युवा सेनेच्या नायगाव विधानसभा उपाध्यक्षपदी उमरी तालुक्यातील इज्जतगाव येथील सुरेश ढगे यांची नियुक्ती झाली. या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी येवले

अर्धापूर - येथील व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन येवले यांची निवड झाली. यावेळी अप्पाराव बुटले, राम पाटील, चंपतराव बारसे, दामोदर जडे, साहेबराव बारसे, गोविंद भुतडा, डॉ.विशाल लंगडे, बाळासाहेब डोंगरे, सचिन बुटले आदी उपस्थित होते.

तीन हायवा पकडले

धर्माबाद - मुरुमाची वाहतूक करणारे तीन हायवा शिवसैनिकांनी पकडून प्रशासनाच्या हवाली केले. एमएच २४-एयु ४५०३, एमएच २४-एयु ०४४७ असे क्रमांक आहेत. तहसीलदार या प्रकरणी कारवाई करणार असल्याची माहिती तलाठी सहदेव बासरे यांनी दिली. सदरचे हायवा शंकरगंज परिसरात अवैध मुरुम वाहतूूक करीत असताना आढळले.

खड्डे बुजवण्यास प्रारंभ

धर्माबाद - धर्माबाद ते कारेगाव रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. कारेगाव, जारीकोट, चोळाखा व परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. मात्र रस्त्याची अक्षरश चाळणी झाली होती. खड्डे वाचविण्याच्या नादात अनेकदा अपघातही घडले होते. रस्ता दुरुस्तीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती.

Web Title: Woman commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.