त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:14 AM2018-11-01T00:14:47+5:302018-11-01T00:15:32+5:30

पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़

The woman committed suicide due to the tragedy | त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

Next
ठळक मुद्देविनयभंग : पिता-पुत्राला ठोकल्या बेड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : पिता-पुत्राकडून विनयभंग केल्यानंतर त्या प्रकरणातील गुन्हा परत घेण्याच्या मागणीसाठी पीडित युवतीचा छळ करण्यात येत होता़ या छळाला कंटाळून अखेर युवतीने राहत्या घरात दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेवून आत्महत्या केली़
सहशिक्षक असलेले मारोती धोंडिबा साखरे हे निवृत्त व्यंकटराव गोपाळे (वय ६५) यांच्या घरी परिवारासह किरायाने राहत होते़ साखरे यांची मुलगी वर्षा (वय १७) हिचा घरमालक गोपाळे यांनी विनयभंग केला होता़ याप्रकरणी गोपाळे यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार आणि विनयभंग या कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला होता़ घटनेनंतर मारोती साखरे यांनी ते घर सोडून राजनगर भागातील भगवान गायकवाड यांच्या घरी खोली घेवून राहत होते़ त्यांची मुलगी वर्षा ही यशवंत महाविद्यालयात शिकत होती़ घटनेनंतर व्यंकटराव गोपाळे आणि त्यांचा मुलगा चंद्रमुनी गोपाळे हे आमच्यावरील दाखल केलेला गुन्हा परत घे असे म्हणून धमकी देत असत़ तसेच अनेकवेळा वर्षा हिच्या मैत्रिणीसमोर या दोघांनी तिचा विनयभंग केला़ सतत होणाºया छळाला कंटाळून वर्षा हिने २१ आॅक्टोबर रोजी घराच्या दुसºया मजल्यावरुन उडी घेतली़ यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती़ त्यानंतर तिची प्रकृती अधिकच बिघडल्याने तिला उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते़ उपचाराला प्रतिसाद देत नसल्यामुळे तिला परत नांदेडातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ या ठिकाणी मंगळवारी रात्री तिचा मृत्यू झाला़

Web Title: The woman committed suicide due to the tragedy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.