धमार्बादेत महिलेचा गळा चिरुन खून; दहा दिवसांनंतर घटना आली उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 07:07 PM2020-03-12T19:07:10+5:302020-03-12T19:10:18+5:30
दहा दिवसापूर्वी घटना घडुनही याची शेजारच्या कोणालाही भणक कशी लागली नाही़ ?
धमार्बाद (जि़नांदेड) : शहरातील सरस्वतीनगर येथील रहिवासी महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला असून ही घटना तब्बल दहा दिवसानंतर उघडकीस आली आहे़ सदर महिलेचा मृतदेह चटईवर टाकून तसेच घराला बाहेरुन कुलूप लावून आरोपी पसार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते़ याप्रकरणी धमार्बाद पोलिसात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.
धमार्बाद शहरातील सरस्वती नगरातील महिला सुनीताबाई ऊर्फ मालनबाई नागोराव सूर्यवंशी (५५) या महिलेचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा खून केला. त्यानंतर आरोपीने सदर महिलेचा मृतदेह घरातील चटईवर टाकून दरवाजाला बाहेरून कुलुप लावून पलायन केले. ही घटना २९ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत घडल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे़ तब्बल १० दिवसानंतर दुर्गंधी सुटल्यामुळे ही घटना उघडकीस आली़ घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक विजय पोवार, उपविभागयी पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक सोहन माछरे, सहा़पोलिस निरीक्षक अशोक उजगरे, अनिल सनगले, गणेश कराड आदींनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी मयताची मुलगी वैशाली संजय शर्मा (रा.खोब्रागडे नगर, नांदेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन धमार्बाद पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खून्याला शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान
दहा दिवसापूर्वी घटना घडुनही याची शेजारच्या कोणालाही भणक कशी लागली नाही़ घराकडे दहा दिवसात कोणीही कसे फिरकले नाही, यासह विविध प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले असून, खून्याचा शोध लावण्याचे पोलिसांपुढे आव्हान उभे आहे़ दरम्यान, तपासासाठी श्वानपथकाला तसेच फिंगर प्रिंट तज्ञांच्या चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. आरोपीला पकडण्यात लवकरच यश मिळेल असा विश्वास पोलिस निरीक्षक तथा तपास आधिकारी सोहन मांचरे यांनी व्यक्त केला आहे.