नांदेड जिल्ह्यातील लहान गावच्या महिलांनी जिंकली दारुबंदीची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 01:06 AM2017-12-14T01:06:19+5:302017-12-14T01:06:40+5:30
नामदेव बिचेवार। लोकमत न्यूज नेटवर्क लहान: येथील ४० वर्षांपासून सुरू असलेले देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी १३ डिसेंबर ...
नामदेव बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
लहान: येथील ४० वर्षांपासून सुरू असलेले देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी १३ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली़ मतदानाला महिलांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाल्याने हा लढा यशस्वी ठरला़ एकूण २ हजार ३२ मतदानांपैकी १ हजार २६९ मतदान झाले़ पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक मतदान झाल्याने लहानमध्ये बाटली आडवी पडली़ या निवडणुकीत महिलांनी १ हजार ११५ मतांनी हा ऐतिहासिक विजय मिळविला़
मागील सहा महिन्यांपासून दारूबंदीसाठी महिलांनी कायदेशीर लढा उभारला होता़ गावकºयांनीही याबाबत पाठपुरावा केला होता़ अखेर दारूबंदीच्या या लढाईत महिला व ग्रामस्थ यशस्वी झाले़ लहान येथील देशी दारू दुकान बंद करण्यासाठी महसूल विभागाकडून मतदान घेण्याची प्रक्रिया करण्यात आली़ यासाठी १३ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले़ गावातील महिलांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती़ गावातील देशी दारू दुकान बंद होणार व व्यसनापासून गावास मुक्ती मिळणार या कल्पनेने महिलांमध्ये आनंद दिसत होता़ तसेच नितीन इंगळे यानेही दारुबंदीसाठी पुढाकार घेतला होता़
सकाळी आठ वाजल्यापासूनच आडव्या बाटलीसाठी मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली़ गावातील तीन वॉर्डातील मतदान पुढीलप्रमाणे, प्रभाग एक - एकूण महिला मतदान ६४२, झालेले मतदान ४४६, प्रभाग दोन - एकूण मतदान ६९५, झालेले मतदान ३९६, प्रभाग तीन - एकूण मतदान ६९७, झालेले मतदान ४२७़ एकूण १ हजार २६९ महिला मतदारांनी मतदानाचे कर्तव्य बजावले़ महिलांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला़
४ या विजयास महिलांचे प्रयत्न सार्थक ठरले़ आडव्या बाटलीचा लढा यशस्वी ठरला आहे़ - शोभाबाई रणखांब, सरपंच़
४दारूबंदीच्या लढ्यासाठी गावकºयांनी व रणरागिनीने प्रचारात आघाडी घेतली होती़ महिला बचत गट, महिला मंडळ, अंगणवाडी सेविका, गावकरी मंडळी व युवकांच्या सहकार्याने हा विजय मिळविला़ - सतीश देशमुख लहानकर, उपसरपंच़
जिल्हाधिकाºयांना सादर करणार अहवाल
४२ हजार ३२ मतदानांपैकी १ हजार २६९ मतदान झाले़ उभी बाटली ९५, आडवी बाटली १११५ व बाद मतदान ५९ झाले़ मतदान ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याने येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यासंदर्भात अहवाल जिल्हाधिकाºयांना देण्यात येईल़ त्यानंतर बंदची कार्यवाही होईल़ - राजेश लांडगे, निवडणूक अधिकारी तथा नायब तहसीलदार, अर्धापूऱ