कौठा गडगा रस्त्याचे खड्डे बुजवण्याचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:18 AM2020-12-06T04:18:45+5:302020-12-06T04:18:45+5:30
कंधार-गडगा रस्ता हा चाळणी झाला. जागोजागी पडलेले आहे. खड्डे दोन्ही बाजूने, वाढलेली झाडी आदी बाबीने वाहनधारक त्रस्त झाले होते. ...
कंधार-गडगा रस्ता हा चाळणी झाला. जागोजागी पडलेले आहे. खड्डे दोन्ही बाजूने, वाढलेली झाडी आदी बाबीने वाहनधारक त्रस्त झाले होते. याकडे कंधार व नायगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे प्रवाशासह वाहनधारक त्रस्त झाले होते. रस्त्यावरील वाढती वाहतूक, कंधार येथील हजीसया व भोईकोट किल्ला पाहाण्यासाठी तेलगंणा राज्यातून येणारी भाविकांची संख्या प्रचंड असते. खड्डेमय रस्त्याने भाविकांची मोठी गैरसोय होत होती. कौठा पुर्नवसन ते गडगा रस्ता दुरुस्ती काम सुरुवात असले तरी कंधार सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असलेला रस्ता तेलुर फाटा ते कंधार हा रस्ता दुरुस्ती काम अद्यापही सुरू झाला नाही. कौठा -गडगा रस्ता दुरुस्ती होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी, ट्रक मालक बारुळ-तेलूर-जाकापूर-कौठा-शिरुर परिसरातील ऊस तोडणी सुरुवात असल्याने शेतकऱ्यांचे व ट्रक मालकाचे नुकसान होऊ नये यासाठी कौठा पुनवर्सन ते टेंभुर्णी फाटा रस्त्यावरील खड्डे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने बुजवल्यानंतर साखरझोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगाव-गडगा कौठा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास सुरुवात केल्याने शेतकरी, ट्रक मालकात समाधान व्यक्त होत आहे.