राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:17 AM2021-04-02T04:17:47+5:302021-04-02T04:17:47+5:30

मळणीयंत्रात हात जाऊन मृत्यू इस्लापूर : मळणीयंत्रातून गहू काढत असताना हात जाऊन ३० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ...

Work on the national highway is incomplete | राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट

राष्ट्रीय महामार्गाचे काम अर्धवट

googlenewsNext

मळणीयंत्रात हात जाऊन मृत्यू

इस्लापूर : मळणीयंत्रातून गहू काढत असताना हात जाऊन ३० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३१ मार्च रोजी दुपारी जलधारा येथे घडली. नागोजी कदम, असे मयताचे नाव आहे. मळणीयंत्रातून गहू काढत असताना ड्रममध्ये काही गहू अडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न नागोजी यांनी केला. यंत्रामध्ये ओढल्या जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, जमादार शेख तपास करीत आहेत.

स्टोन क्रशर बंद करण्याची मागणी

हदगाव : हदगाव- हिमायतनगर रोडवरील मौजे दगडवाडी येथे स्टोन क्रशर सुरू आहे. याबाबत रहिवासी एस.एस. वानखेडे व इतरांनी तहसीलदारांकडे तक्रार दिली. गिट्टीनिर्मिती प्रक्रियेतून प्रदूषित वाळू तयार होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. निवेदनावर एस. वानखेडे, बाबूराव भिसे, ज्ञानेश्वर वानखेडे, जनार्दन वानखेडे, भाऊराव वानखेडे, बाबाराव नरवाडे व इतरांची नावे आहेत.

हिमायतनगर तालुक्यात १५० पॉझिटिव्ह रुग्ण

हिमायतनगर : हिमायतनगर शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ३० मार्च रोजी ४२, ३१ रोजी २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ४ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

तालुक्यात जवळपास पॉझिटिव्ह रुग्णसंख्या १५० च्यावर झाली. काहींना घरी, तर काहींना कोविड केअर सेंटरमध्ये, तर काहींना नांदेडला उपचारासाठी पाठविले, अशी माहिती आरोग्य विभागाचे धांदे यांनी दिली. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.

माहिती अधिकार कायद्याकडे दुर्लक्ष

कुंटूर : माहिती अधिकार कायद्याखाली दिलेल्या अर्जाविषयी माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार नागरिकांची आहे. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारही करण्यात आली. संबंधित ग्रामसेवक, तलाठी अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप आहे.

कोरोना लसीकरण सुरू

बारड : येथील ग्रामीण रुग्णालयांतर्गत कै. गणपतराव कोरे सभागृहात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किशोर कदम, ग्रामविकास अधिकारी अनुप श्रीवास्तव, डॉ. किरण देशमुख, अमोल टेकले, कर्मचारी अतुल कांबळे, प्रतिभा जाधव, गंगासागर पुठ्ठेवाड, सुमित्रा मेहकर, गजानन तायवाडे, नामदेव मुळे, सय्यद अली आदी उपस्थित होते.

कुंटूरला कोरोना लसीकरण

कुंटूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला. यावेळी मारोतराव कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनवणे, ग्रामसेवक दंपलवार, शीला मॅडम यांची उपस्थिती होती. यावेळी ज्येष्ठ नागरिक नारायण शिंदे, पत्रकार आंबटवार यांना लस देण्यात आली. गावातील नागरिकांनी लसीचा फायदा घ्यावा, असे आवाहन मारोतराव कदम यांनी केले.

Web Title: Work on the national highway is incomplete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.