प्रा.आ.केंद्राचे कामकाज ढेपाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:03+5:302020-12-26T04:15:03+5:30
कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत जि.प आरोग्य विभागानी दोन महिन्यांपासून ज्या-त्या प्रा. आ.केद्रास कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर घेऊन ...
कोरोना पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत जि.प आरोग्य विभागानी दोन महिन्यांपासून ज्या-त्या प्रा. आ.केद्रास कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर घेऊन ठरवून दिलेले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी उपयुक्तत दिशा-निर्देश दिले आहे. सध्या शेती कामातून थोडी उसंत मिळते. अशा परिस्थितीत इच्छुक जोडपं नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देतो. गावात घरोघरी भेट देऊन कुटूंब कल्याण शस्ञ या राष्ट्रीय कार्यक्रमाची माहिती देण्यास आरोग्य विभाग कमी पडत आहे. तसेच या कामी वरिष्ठांचे नियंत्रण तोकडे पडत असल्याचे बोलल्या जात आहे.
जवळपास आठ आरोग्य उप-केंद्राचा विस्तार जोडलेल्या प्रा.आ.केंद्र कोठारी (मांडवी) येथे तीन डॉक्टर सेवारत आहे अशा महत्वाच्या ठिकाणी असलेल्या या आरोग्य केंद्राचा कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीराचा आकडा माञ निरंक आहे.
प्रतिक्रिया
गत वर्षी प्रमाणे ग्रामीण रूग्णालयात शिबीर घेऊन कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात यावा - इंदल राठोड (पं.स.स. किनवट)
शस्त्रक्रिया कक्ष दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर येथे शिबीर घेण्यात येईल -डॉ. संजय मुरमूरे (तालुका वैद्यकीय अधिकारी, किनवट. )
शासकीय ग्रामीण रूग्णालयात कुटूंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यास कसलीही हरकत नाही - डॉ. विक्रम राठोड, (वैद्यकीय अधीक्षक मांडवी)