‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंसह १७ प्राध्यापकांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:14 AM2021-07-01T04:14:21+5:302021-07-01T04:14:21+5:30

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. राजाराम माने, प्रा. वसंत वाघ, प्रा. राहुल पिंजारी, प्रा. काशीनाथ बोगले, प्रा. शैलेश ...

The World Scientist and University Rankings include 17 professors, including university vice-chancellors. | ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंसह १७ प्राध्यापकांचा समावेश

‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्ये विद्यापीठाच्या कुलगुरूंसह १७ प्राध्यापकांचा समावेश

googlenewsNext

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रा. राजाराम माने, प्रा. वसंत वाघ, प्रा. राहुल पिंजारी, प्रा. काशीनाथ बोगले, प्रा. शैलेश वाढेर, प्रा. अनुपमा पाठक, प्रा. कृष्णा चैतन्य, प्रा अनिकेत मुळे, प्रा. ज्ञानेश्वर पवार, प्रा. अर्जुन भोसले, प्रा. संजय पेकमवार, प्रा. शैलेश पटवेकर, प्रा. के. विजयकुमार यांचा समावेश आहे. तर उपकेंद्रातील विकास हंबे, इब्राहिम राहावे आणि फुरसत याबीन या संशोधकांचाही समावेश आहे.

‘आल्पर-डॉझर सायंटिफिक इंडेक्स’ चे जनक अमेरिकेच्या निशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर व प्रा.सिहान डॉझर हे आहेत. संशोधकांनी मागील पाच वर्षांतील एच इंडेक्स, आयटेन इंडेक्स आणि सायटेशन स्कोअर या बाबी विचारात घेऊन युनिव्हर्सिटी रँकिंग, कंट्री रँकिंग, रिजन रँकिंग आणि वर्ल्ड रँकिंग ठरविण्यात आलेले आहे.

१८१ देशांतील १० हजार ६५५ विद्यापीठातील ५ लाख ६५ हजार ५५३ संशोधकांची माहिती संकलित करून ही श्रेणी ठरविण्यात आलेली आहे. त्यामध्ये अर्थशास्त्र, विधी, तत्त्वज्ञान, कृषी, कला, वाणिज्य व व्यवस्थापन, सामाजिकशास्त्र, वैद्यकीय व आरोग्य विज्ञान, इतिहास यासह २५६ उपशाखांमधील संशोधकांनी या नामांकनात स्थान मिळविलेले आहे. या रँकिंगमध्ये स्थान मिळाल्यामुळे युजीसी आणि ‘सॅप’मध्ये वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून या प्राध्यापकांची नोंद होत असते व तसेच ‘नॅक’साठी सामोरे जाताना विद्यापीठाला चांगला दर्जा मिळविण्यासाठी यांची निश्चितच मदत होते.

विद्यापीठाच्या कुलगुरूंसह सर्व संशोधक, प्राध्यापक यांचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.

Web Title: The World Scientist and University Rankings include 17 professors, including university vice-chancellors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.