आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पोलीस अधीक्षकांकडे लेखी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:18 AM2021-03-27T04:18:24+5:302021-03-27T04:18:24+5:30
माहूर येथील एका प्रकरणात विष्णू टेंबरे याला तडजोड करण्यासाठी २१ मार्च रोजी आई देवकाबाई टेंबरे व वझरा शेख ...
माहूर येथील एका प्रकरणात विष्णू टेंबरे याला तडजोड करण्यासाठी २१ मार्च रोजी आई देवकाबाई टेंबरे व वझरा शेख फरीद येथील प्रतिष्ठित नागरिकांनी बोलावून घेतले होते. परंतु तेथे तडजोड न होता वाद घालून देवकाबाईस जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की करून अपमानीत केले होते. दरम्यान, सदर प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. परंतु, वाद मिटेल, अशी परिस्थिती असल्याने रात्री उशिरा त्यांच्या घरी जाऊन मारहाण करण्यात आली.
या प्रकरणात नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलीस संरक्षण देण्यात यावे, आरोपीवर जातीवाचक शिवीगाळ, दरोडा टाकून विनयभंग करणे, मारहाण करणे आदी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली.
निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, माहूर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नांदेड समितीकडे देण्यात आल्या आहेत.