शॉर्टकटसाठी राँग साईड चुकीचीच; हीच वेळबचत ठरू शकते जीवघेणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:13 AM2021-06-27T04:13:31+5:302021-06-27T04:13:31+5:30
नांदेड शहरातील वजिराबाद आणि चिखलवाडी वनवे, जुना मोंढा गोलाई यासह श्रीनगर, वर्कशाॅप, फुले मार्केट परिसरात सर्वाधिक अपघात होत आहेत. ...
नांदेड शहरातील वजिराबाद आणि चिखलवाडी वनवे, जुना मोंढा गोलाई यासह श्रीनगर, वर्कशाॅप, फुले मार्केट परिसरात सर्वाधिक अपघात होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक शाखेने पाॅइंट नेमून कर्मचारी नियुक्त करणेही गरजेचे आहे.
वजिराबाद रस्ता
शहरातील वजिराबाद चाैक ते तारासिंग मार्केटमधून मोंढ्यात जाण्यासाठी वनवे असतानाही अनेकजण राँग साईड वापरतात.
अपघातांना निमंत्रण
या भागातील गर्दीदेखील लक्षात घेतली जात नाही. त्यामुळे एकाच वेळी होणारी गर्दी आणि राँग साईडचा वापर केला जातो, हे दिसून आले.
पोलीस एकाच ठिकाणी
वाहतूक कोंडी झाल्याचे पाहूनदेखील कर्तव्यावर असलेला पोलीस कर्मचारी काहीच झाले नाही, अशा पद्धतीने एकाच ठिकाणी उभा होता.
जुना मोंढा गोलाई
बाफनाकडून जुना मोंढा परिसरातील गोलाईतून महावीर चौकाकडे जाणारे बहुतांश वाहनधारक राँग साईडचाच वापर करतात.
पोलीस चाैकी नावालाच
या ठिकाणी शहराची मुख्य बाजारपेठ आणि सर्वाधिक गर्दी असल्याने उभारलेली पोलीस चाैकी नावालाच असल्याचे दिसून आले.
हातगाड्यांवर नियंत्रण
मोेंढ्यात ठोक विक्रेत्यांची संख्या अधिक असल्याने हातगाडेदेखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना शिस्त लावण्याची गरज आहे.
श्रीनगर
श्रीनगर येथील एखाद्या दुकानात जाण्यासाठी यू टर्न घेऊन येण्याची तसदी अनेकजण घेत नाहीत. थेट राँग साईडचाच वापर केला जातो.
दुचाकींचे अपघात
वर्कशाॅप ते स्नेहनगर वसाहतदरम्यान श्रीनगर परिसरात दुचाकीचालकांचे अपघात नित्याचेच झाले आहेत. पंचशीलजवळ जास्त अपघात होतात.
सतर्कतेची गरज
या ठिकाणी होणाऱ्या किरकोळ अपघातांवरून वाद होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांनी सतर्क होणे गरजेचे आहे.