दहावीचे विद्यार्थी यंदा सवलतीच्या गुणापासून वंचित?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:18 AM2021-04-01T04:18:47+5:302021-04-01T04:18:47+5:30
चौकट परीक्षा मंडळाने प्रस्तावही मागवले माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दावीपरीक्षेस पात्र असलेले व शासकीय रेखा कला परीक्षा ...
चौकट
परीक्षा मंडळाने प्रस्तावही मागवले
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दावीपरीक्षेस पात्र असलेले व शासकीय रेखा कला परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रस्ताव शाळेने मंडळाकडे सादरही केलेले आहेत. या सवलतीच्या गुणांसाठीचे प्रस्ताव मंडळाच्या आदेशानुसार १५ जानेवारी २०२१ पर्यंत सादरही केलेले आहेत. ऐनवेळी राज्य सरकारने सवलतीचे गुण न देण्याच्या निर्णयाने विद्यार्थी, शिक्षक व पालक संभ्रमात आहेत.
कोट---------------
राज्य सरकारने २६ मार्चला अचानक आदेश काढून रेखाकला परीक्षेचे सवलती अतिरिक्त गुण देण्यात येऊ नयेत असा आदेश काढला. त्यामुळे पात्र व उत्तीर्ण विद्यार्थ्यांवर हा अन्याय होत आहे. या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण दिले गेलेच पाहिजेत अशी मागणी विविध कलािशक्षकांच्या संघटनेच्यावतीने व पालकातूनही होत आहे. गतवर्षी दहावीचा पेपर झाला नाही तरी सरासरी गुण दिले मग जे विद्यार्थी शासकीय रेखा कला परीक्षा उत्तीर्ण असूनही, प्रस्ताव दाखल केले असताना अचानक हे सवलतीचे गुण देणे रद्द का?
-राजीव अंबेकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक आघाडी भाजप महानगर, नांदेड.