दाभड येथील दत्त संस्थानची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:17 AM2021-01-22T04:17:21+5:302021-01-22T04:17:21+5:30
नांदेडला कराटे प्रशिक्षण, मार्शल आर्टचे धडे नांदेड : युथ असाेसिएशन इंडिया दिल्लीची शाखा नांदेडला सुरू करण्यात आली. यामध्ये मार्शल ...
नांदेडला कराटे प्रशिक्षण, मार्शल आर्टचे धडे
नांदेड : युथ असाेसिएशन इंडिया दिल्लीची शाखा नांदेडला सुरू करण्यात आली. यामध्ये मार्शल आर्ट, स्काऊट गाईड, योगा, कराटे शिकविण्यात येतात. शिकवणीचा कालावधी ९० दिवसांचा असतो. त्यानंतर विद्यार्थ्यांची फिजिकल टीचर म्हणून नियुक्ती केली जाते. अधिक माहितीसाठी विजयकुमार जोशी, गणेशनगर टी पाॅईंट यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
बोधडीत शोभायात्रा
बोधडी : येथे श्री राम जन्मभूमी मंदिर समर्पण अभियान यानिमित्त जनजागरण करण्यासाठी शोभायात्रा झाली. ही शोभायात्रा बालाजी मंदिर येथून सुरू होऊन राम मंदिर बाजार चौक येथे विसर्जन झाले. यावेळी शेकडो राम भक्तांनी यात सहभाग घेतला.
दिव्यांगांचा मोर्चा
नांदेड : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेल. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा सुरू होणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
दरेगाववाडीत काॅंग्रेसप्रणित पॅनेल
मुदखेड : तालुक्यातील दरेगाववाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत काॅंग्रेसप्रणित शेतकरी ग्रामविकास पॅनेलच्या तीन जागा निवडून आल्या. पॅनेलप्रमुख शिवकांता अवधूत गुंडे ह्या असून विजयी उमेदवारात दत्ता श्यामराव पेशेटवाड, रंजनाबाई आनंदा ककुर्ले, साैमित्रा साहेबराव राहेरे यांचा समावेश असून जिजाबाई धनू जाधव यांनी पाठिंबा दिला आहे.
बलात्काराचा निषेध
नांदेड : भोकर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या पाच वर्षीय मुलीवरील बलात्काराचा युवासेनेच्यावतीने निषेध करण्यात आला. निवेदनावर साैरभ शेळके, हर्षवर्धन पाटील, विपीन वाघमारे, अजय सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ध्वजारोहण कार्यक्रम
नांदेड : भारतीय प्रजासत्ताकाचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ महापालिकेत २६ जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. मनपाच्या मुख्य कार्यालयाच्या प्रांगणात महापाैर मोहिनी येवनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार असल्याचे आयुक्तांनी कळविले.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या
नांदेड : शहरातील गोवर्धन टेकडी येथील अनिल गायकवाड (२४) या युवकाने मंगळवारी घराच्या पत्र्याच्या तुळीला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजलेले नाही. वजिराबाद पोलिसांनी सदाशिव पोटभरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. पुढील तपास फोैजदार जाधव करीत आहेत.
रक्तदान शिबिर
किनवट : बळीराम पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात रासेयोच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ४० जणांनी रक्तदान केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, गोविंद राठोड, शंकरराव चाडावार, जसवंतसिंघ सोखी, डाॅ.प्रशांत, डाॅ. शिंदे आदी हजर होते.
कोरोना लसीकरण
मुदखेड : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सीईओ वर्षा ठाकूर यांच्या हस्ते कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, उपाध्यक्षा पद्मा रेड्डी, सभापती बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा परिषद सदस्या अरुणा पाटील आदी उपस्थित होते.
इंधन बचत मोहीम
कंधार : येथील आगारात इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ शनिवारी प्राचार्य पगडे यांच्या हस्ते झाला. आगारप्रमुख एच. एम. ठाकूर अध्यक्षस्थानी होते. डाॅ. गंगाधर तोगरे, डाॅ. साैरभ अल्लडवाड प्रमुख पाहुणे म्हणून होते. आशिष जोगे यांनी सूत्रसंचालन तर माधवराव तेलंग यांनी आभार मानले. यावेळी वाहतूक निरीक्षक केंद्रे, लेखाकार डी. के. केंद्रे, वरिष्ठ लिपीक शेख हलील, एस. के. मठपती आदी उपस्थित होते.
वझर भाजपाकडे
देगलूर : तालुक्यातील वझर ग्रामपंचायतीवर पळणीटकर पॅनेलचे सर्व ११ उमेदवार निवडून आले. पळणीटकर भाजपाचे आहेत. त्यांनी बहुजन विकास आघाडी पॅनेल उभारले होते. विरोधी पॅनेलचे तेजेराव लवटे यांना मतदारांनी नाकारले. नूतन सदस्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी उज्ज्वला पळणीटकर, रुक्मिणबाई मदने, सुनीता मदने, लक्ष्मीबाई चोरमल्ले, सविता खरात आदी उपस्थित होते.