या अस्वस्थ काळात मानसिक व आरोग्य स्थैर्यासाठी योगाभ्यासच प्रभावी पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:14 AM2021-06-21T04:14:11+5:302021-06-21T04:14:11+5:30

योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा एक भक्कम आधार आहे. कोणतीही व्यक्ती या दोन आधारावर भक्कमपणा साध्य करु शकते. ...

Yoga is an effective alternative for mental and health stability during these turbulent times | या अस्वस्थ काळात मानसिक व आरोग्य स्थैर्यासाठी योगाभ्यासच प्रभावी पर्याय

या अस्वस्थ काळात मानसिक व आरोग्य स्थैर्यासाठी योगाभ्यासच प्रभावी पर्याय

Next

योग म्हणजे शरीर आणि मनाला जोडणारा एक भक्कम आधार आहे. कोणतीही व्यक्ती या दोन आधारावर भक्कमपणा साध्य करु शकते. स्वत:चे संपूर्ण शरीर संतुलीित ठेवून जसे दोन पायांवर ताठ उभे राहणे शक्य आहे त्याच धर्तीवर मनाला शुद्ध ठेवल्याशिवाय व्यक्तिमत्त्व म्हणून, उत्तम आरोग्याचा साधक म्हणून उभे राहता येत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आव्हाने कितीही आली तरी एकवेळ शरीर स्वास्थ्य माणसाला टिकवता येऊ शकेल परंतु मनस्वास्थ्य टिकेल याची शाश्वती नाही. नोकरीमधील ताण-तणाव, कामातील गुणवत्ता साध्य न झाल्यास येणारी नैराश्यता या नैराश्यतेतून होणारी चिडचिड, एकमेकांवर प्रत्यारोप हे सारे मार्ग आयुष्याला उद्धवस्थ करणारे आहेत. यातून बाहेर पडण्याचा महत्वपूर्ण मार्ग म्हणून सारे जग आता योगाकडे पाहत असल्याचे केंद्रे यांनी सांगितले.

माणसाला अपघात आणि आनुवंशिक आजार जर सोडले तर जवळपास बहुतांश असे ८७ टक्के विकार हे मनाच्या अस्थैैैैैै र्यातून निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. ज्याचे मन जितके खंबीर तो व्यक्ती आरोग्याच्यादृ ष्नेषी तितका खंबीर हे आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोरोनाच्या या कालावधीत जे मनाने खंबीर होते ते अधिक लवकर सावरले, बरे झाले याकडे दूर्लक्षुन चालणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचे वात, पित्त, कफ हे त्रिदोष समान आहेत. स्वास्थ्य म्हणजेच ज्यांचा अग्नी प्रदिप्त आहे. स्वास्थ्य म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, अस्थी, शुक्रधातू समान आहेत. मल विसर्जन विनासायास पार पडते आणि इंद्रिय, मन, आत्मा प्रसन्न आहे म्हणजे स्वास्थ्य आहे अशी साधी व्याख्या योग पंडित केंद्रे यांनी सांगितले.

चौकट- आज २१ जून हा दिवस जगभर योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे.दररोज नित्य नियमाने सकाळी रिकाम्या पोटी ४५ मिनिटे योगाभ्यास केल्यास शरीर मानसिक आध्यात्मिक दृष्टिने समृद्ध होईल. योगाभ्यास वयाच्या १२ व्या वर्षापासून अखेरच्या श्वासापर्यंत कोणत्याही महिला-पुरुषाला करता येऊ शकते. यास धर्म, वंश, देश याचे बंधन नाही. व्यक्तीचे मन याने हलके होते. कार्यक्षमता आणि सकारात्मकता वाढीस लागते. दैनंदिन ताण तणाव निघून जातात, असे केंद्रे म्हणाले.

Web Title: Yoga is an effective alternative for mental and health stability during these turbulent times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.