आजपासून योग शिक्षक वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:19 AM2020-12-06T04:19:05+5:302020-12-06T04:19:05+5:30

दिक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना आवाहन नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दिक्षांत समारंभ पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये ...

Yoga teacher class from today | आजपासून योग शिक्षक वर्ग

आजपासून योग शिक्षक वर्ग

Next

दिक्षांत समारंभासाठी विद्यार्थ्यांना आवाहन

नांदेड- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २३ वा दिक्षांत समारंभ पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात पदवी आवेदन पत्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परिक्षा विभागातील कोनव्होकेशन विभागातून उपलब्ध करुन सादर करावा. सदर आवेदन पत्र ऑनलाईल लिंकवर ५ डिसेंबरपासून उपलब्ध झाल्याचे परिक्षा व मुल्यमापन मंडळाने कळविले आहे.

राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

नांदेड- जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे १२ डिसेंबर रोजी नांदेड येथील जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक, सहकार आणि कामगार न्यायालय येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे श्रीराम जगताप व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. आर.एस. रोटे यांनी दिली. या लोक अदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भू संपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, बँकाची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहेत. याबरोबरच प्रलंबित तडजोड पात्र फौजदारी प्रकरणेही लोक न्यायालयात ठेवण्यात येतील.

Web Title: Yoga teacher class from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.