तूच सुखकर्ता... तूच दु:खहर्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:19 AM2021-09-11T04:19:54+5:302021-09-11T04:19:54+5:30
चौकट- गुुरुवारी सायंकाळपासून बाजारपेठ हाऊसफुल्ल गुरुवारी सायंकाळपासूनच वजिराबाद, जुना मोंढा, छत्रपती चौक, काबरानगर, भाग्यनगर, तरोडा नाका, अण्णा भाऊ साठे ...
चौकट-
गुुरुवारी सायंकाळपासून बाजारपेठ हाऊसफुल्ल
गुरुवारी सायंकाळपासूनच वजिराबाद, जुना मोंढा, छत्रपती चौक, काबरानगर, भाग्यनगर, तरोडा नाका, अण्णा भाऊ साठे चौक, इतवारा या भागात आरास आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. कोरोनामुळे घरच्या घरी सजावट करण्यावरच अधिक भर देण्यात आला.
चौकट-
नेत्यांनी केली घरी प्राणप्रतिष्ठा
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपल्या घरी गणरायाची विधीवत प्राणप्रतिष्ठा केली; तर खासदार प्रतापराव चिखलीकर यांनीही सहकुटुंब पूजा केली. आमदार अमरनाथ राजूरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे यांच्या घरीही बाप्पांचे आगमन झाले.
चौकट-
आतापर्यंत ३७ मंडळांनाच परवानगी
जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत शहरात आठ आणि ग्रामीण भागात २९ मंडळांनी परवानगी घेतली होती. परवानगीची प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे रात्रीपर्यंत ही संख्या आणखी वाढू शकते. गतवर्षी कोरोनामुळे गणेश मंडळांची संख्या अर्ध्यावरच आली होती. यंदा मात्र त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवानिमित्त जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.