पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 03:38 PM2020-05-20T15:38:57+5:302020-05-20T15:40:32+5:30

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले.

The young couple, who had returned from Pune, were also rejected by their families; The villagers chased him away | पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

पुण्याहून परतलेल्या तरुण दाम्पत्याला घरच्यांनीही नाकारले; ग्रामस्थांनी हाकलले

Next
ठळक मुद्देपिण्याचे पाणीही कुणी दिले नाहीकोल्हेबोरगाव येथील घटना

बिलोली  (जि. नांदेड) : लॉकडाऊनमुळे  बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथील दाम्पत्य पुणे येथून गावात परतले. मात्र, त्यांना घेण्यासाठी घरच्यांनी नकार दिला. गावकऱ्यांनीही तिरस्कार केला. पिण्यासाठी पाणीही दिले नाही, असा भीषण प्रसंग त्यांच्यावर ओढवला.

व्यवसायानिमित्त हे दाम्पत्य पुणे येथे राहावयास गेले होते. तथापि, कोरोनामुळे गावाची ओढ त्यांना लागली. १८ मे रोजी हे दाम्पत्य कोल्हेबोरगाव येथे आले. त्यावेळी कटू प्रसंगाना तोंड द्यावे लागले. आपल्या संसाराचे गाठोड डोक्यावर घेऊन पत्नीसह तब्बल तीन तास त्यांना रखरखत्या उन्हात ताटकळत उन्हात उभे राहावे लागले. भुकेने व्याकूळ, तहानेने त्रासून गेलेल्या या दाम्पत्याच्या मदतीला ना रक्ताची नाती कामी आली, ना प्रशासन. घरच्या मंडळींसह ग्रामस्थांनी नाकारल्याने तरुण दाम्पत्याने कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानात छोटी झोपडी टाकून तात्पुरता आधार घेतला आहे.  उपाशीपोटी दिवस काढण्याची वेळ आमच्यावर आली असून आयुष्यात कधीच न विसरणारा हा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया दाम्पत्याने दिली. बिलोली तालुका प्रशासनाने जिल्हाबाहेरुन आलेल्या मजुरांसाठी शाळा, समाजमंदिर व गावाबाहेर क्वारंटाईन करुन ग्रामस्तरावर देखरेख समिती स्थापन केल्याचे सांगून स्वत:चा उदो-उदो करुन घेतला  खरा. प्रत्यक्षात कोल्हे बोरगाव येथे असे काहीच नसल्याचे भयावह चित्र या दाम्पत्यामुळे समोर आले. या दाम्पत्याला प्रशासनाने न्याय मिळवून देण्याची मागणी आता होत आहे.


उपाशीपोटी दिवस काढत आहोत 
गावकऱ्यांनी आमचा तिरस्कार केला... पाणीही दिले नाही... पत्नीसोबत शाळेत राहावयास तयार असताना शाळाही देण्यात आली नाही. रखरखत्या उन्हात आम्हाला गावाबाहेर काढण्यात आले आहे. आम्ही कंधार तालुक्यातील रुई गावच्या माळरानावर उपाशीपोटी दिवस काढत आहोत 
- काशीनाथ मानेमोड, स्वाती मानेमोड,  दाम्पत्य, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

क्वारंटाईनची सोय नाही 
सद्य:स्थितीत गावात घराव्यतिक्ति कसल्याच प्रकारची क्वारंटाईनची सोय करण्यात आली नसल्याने त्या दाम्पत्यांना गावाबाहेर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 
-नागोराव करेवाड, पोलीस पाटील, कोल्हेबोरगाव ता. बिलोली.

 

Web Title: The young couple, who had returned from Pune, were also rejected by their families; The villagers chased him away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.