तरुण भाविकांचा पोलिसांवरच हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:59+5:302021-03-31T04:17:59+5:30
पोलिसांना होती पूर्वसूचना मागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु त्यावेळी मोठा गोंधळ ...
पोलिसांना होती पूर्वसूचना
मागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणूक काढण्यात आली होती. परंतु त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. मिरवणुकीत मास्क वापरण्यात आले नव्हते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार होणार याची पूर्वसूचना होती. अशी कबुली पोलीस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.
गुुरुद्वारा येथील धर्मगुरुंनी मिरवणूक निघणार नाही अशी प्रशासनाला ग्वाही दिली होती. परंतु काही जणांनी तो शब्द पाळला नाही. त्यामुळे या घटनेला केवळ प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाही. घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.
नांदेडमध्ये पोलिसांना नीट काम करू दिले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृती फोफावल्या आहेत. अशी टीका खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. तसेच धुळवडीच्या दिवशीच गुरुद्वाराचे सचिव मुंबईला कसे गेले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.